‘भारत जोडो’त समविचारी पक्षांना सहभागी करा; काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 08:39 AM2022-11-03T08:39:00+5:302022-11-03T08:40:07+5:30
काँग्रेस भवनात झालेल्या या बैठकीत प्रारंभी गुजरातच्या मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजंली अर्पण करण्यात आली.
नाशिक : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती विभागाची बैठक पक्ष निरीक्षक प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात येऊन त्यात समविचारी पक्षांना या यात्रेत सहभागी करून घेण्याबाबत आवाहन करण्याचे ठरविण्यात आले.
काँग्रेस भवनात झालेल्या या बैठकीत प्रारंभी गुजरातच्या मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजंली अर्पण करण्यात आली, तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी पक्ष निरीक्षक पवार यांनी, भारत जोडो यात्रेत तीन प्रकारचे यात्री सहभागी आहेत. त्यात भारत यात्री, राज्य यात्री आणि जिल्हा यात्री अशा पद्धतीने विभाग आहेत.
यावेळी सुरेश मारू, रमेश साळवे, कुसुम चव्हाण, सुभाष हिरे, राजेश लोखंडे, मिलिंद हांडोरे आदींनीही आपले मत मांडले. बैठकीला हनिफ बशीर, इशाक कुरेशी, उमाकांत गवळी, अरुण दोंदे, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्युली डिसुजा, ॲड. मीना वाघ, माया काळे, सारिका किर, अमोल मरसाळे, विलास बागूल, सुभाष हिरे, अशोक शेंडगे, पवन जगताप, राजेश लोखंडे, आनंद संसारे, प्रकाश पंडित आदी उपस्थित होते.