राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार

By संजय पाठक | Published: March 12, 2024 10:56 AM2024-03-12T10:56:05+5:302024-03-12T10:57:54+5:30

या त्यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत.

Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra tomorrow in Nashik Sharad Pawar, MP Sanjay Raut will be present | राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार


नाशिक- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या म्हणजे बुधवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे येणार आहे. त्यानंतर गुरुवारी चांदवड येथे त्यांची सभा होणार असून नाशिक शहरात रोड शो होणार आहे. या त्यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत.

 राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे उद्या नाशिकच्या दौऱ्यावर असून  निफाड तालुक्यात शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत तर खासदार संजय राऊत यांचे आज नाशिकमध्ये आगमन होणार असून सिन्नर तालुक्यात एका धार्मिक कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर त्यांचा नाशिकमध्ये तीन दिवस मुक्काम असणार आहे. या दरम्यान ते राहुल गांधी यांच्या समवेत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. गुरुवारी चांदवड येथे राहुल गांधी यांची सभा झाल्यानंतर ते पिंपळगाव ओझर मार्गे नाशिक शहरात दाखल होणार आहेत शहरातील द्वारका चौफुली येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे तेथून जुने नाशिक दूध बाजार, गाडगे महाराज चौक ते शालिमार म्हणजेच इंदिरा गांधी चौक असा त्यांचा रोड शो होणार आहे शालिमार येथे त्यांची चौक सभा होणार असून त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी रवाना होणार आहेत आणि तेथून पुढे पालघर कडे मार्गस्थ होणार आहेत.

Web Title: Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra tomorrow in Nashik Sharad Pawar, MP Sanjay Raut will be present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.