राहुल गांधी यांच्या विमानातील बिघाड संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:51 AM2018-04-28T00:51:16+5:302018-04-28T00:51:16+5:30
अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीहून हुबळी येथे येत असताना विमानामध्ये संशयास्पद तांत्रिक बिघाड केला गेला, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नाशिक शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
नाशिक : अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाचे राष्टय अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीहून हुबळी येथे येत असताना विमानामध्ये संशयास्पद तांत्रिक बिघाड केला गेला, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नाशिक शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. देशामध्ये संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे, राहुल गांधी यांच्या आक्रमक कार्यशैलीचा काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना त्रास होत आहे. म्हणून अशा नेतृत्वाला लोकशाही पद्धतीने पराभूत करणे अवघड असल्यामुळे अपघातासारख्या मार्गाने संपवण्याचा कट शिजवला जात आहे की काय? असा संशय सामान्य कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरी उडान मंत्रालयाच्या संबंधित अधिकारी विमानाच्या तांत्रिक बाबीची चौकशी करून दोषांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर डॉ. शोभा बच्छाव, शरद अहेर, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, लक्ष्मण जायभावे, चारुशीला काळे, सुरेश मारू, मुन्ना ठाकूर, इसाक कुरेशी, सुनीता ढाकणे उपस्थित होते.