राहुल गांधी यांचा दौरा ठरला! नाशिकला सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 02:18 PM2024-03-09T14:18:34+5:302024-03-09T14:18:57+5:30
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यापूर्वी १२ मार्चला नाशिकला येणार होती; मात्र आता सुधारित कार्यक्रम पक्षाने दिला आहे. त्यानुसार १३ तारखेला यात्रा नाशिकमध्ये येईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी दिली आहे.
नाशिक : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा दौरा निश्चित झाला असून १३ मार्चला ते धुळ्यावरून मालेगावला येऊन मुक्कामी थांबणार आहेत. १४ मार्चला ग्रामीण भागात दौरा करून नाशिक शहरात दाखल होतील. शालिमार चौकात त्यांची सभा होणार असून, पुढे ते त्र्यंबकेश्वर मार्गे पालघरकडे रवाना हेाणार आहेत. राहुल गांधी हे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणार असले, तरी रामचंद्रांचे दर्शन घेण्याचे मात्र तूर्तास नियोजन नसल्याचे अधिकृत दौऱ्यात नमूद करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यापूर्वी १२ मार्चला नाशिकला येणार होती; मात्र आता सुधारित कार्यक्रम पक्षाने दिला आहे. त्यानुसार १३ तारखेला यात्रा नाशिकमध्ये येईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी दिली आहे.
गावाबाहेर मुक्काम
राहुल गांधी हे मालेगाव येथे आल्यानंतर गावात कॉर्नर सभा आणि ‘रोड शो’ करणार आहेत. त्यानंतर ते एका शेतीत मुक्काम करतील. मालेगाव येथून राहुल गांधी १४ मार्चला चांदवड येथे जाणार असून, सकाळी १० वाजता त्यांची सभा होईल. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील उपस्थित राहतील.