राहुल गांधी यांचे ओझर विमानतळावर स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:52 AM2019-04-27T00:52:03+5:302019-04-27T00:52:37+5:30
येथील विमानतळावर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे शुक्रवारी सायंकाळी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. संगमनेर (जि. नगर) येथील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नियोजित सभेसाठी ओडिशातील बालासोर येथून राहुल गांधी यांचे ओझर विमानतळावर सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास आगमन झाले.
ओझर (नाशिक) : येथील विमानतळावर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे शुक्रवारी सायंकाळी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. संगमनेर (जि. नगर) येथील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नियोजित सभेसाठी ओडिशातील बालासोर येथून राहुल गांधी यांचे ओझर विमानतळावर सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास आगमन झाले. यावेळी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रदेश प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, प्रदेश पदाधिकारी राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड आदी उपस्थित होते. राहुल गांधी यांची सभा यापूर्वी सिन्नर येथे आयोजित करण्यात आली होती; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ते ठिकाण नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे बदलण्यात आले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी विखे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे दिला होता. विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवित आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील राजकारणात माजी मंत्री व कॉँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना पाठबळ देण्यासाठी राहुल गांधी यांची सभा महत्त्वाची मानली जात आहे.