10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना त्यांच्या वडिलांसोबत सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 01:02 PM2021-08-17T13:02:05+5:302021-08-17T13:02:33+5:30
Sabarimala Temple एका दहा वर्षीय मुलीने मंदिर प्रवेशासाठी हाय कोर्टात याचिका दाखल केली.
तिरुवनंतपुरम:केरळउच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिर प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. आता 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींनाही त्यांच्या वडिलांसोबत सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केरळउच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आता 10 वर्षाखालील मुली आपल्या वडिलांसोबत शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतात.
या प्रकरणात, 9 वर्षांच्या मुलीने न्यायालयात एक याचिका दाखल केली होती ज्यात तिने 23 ऑगस्ट रोजी वडिलांसोबत सबरीमाला मंदिरात जाण्याची अपील केली होती. मुलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी सांगितले की, तिला 10 वर्ष होण्यापूर्वीच सबरीमालाला जायचे आहे. कारण त्यानंतर ती चार दशकांहून अधिक काळ मंदिरात जाऊ शकणार नाही.
न्यायालयाने काय म्हटले?
यावर न्यायालयाने म्हटले, "आमचे मत आहे की याचिकाकर्त्या मुलीला तिच्या वडिलांसोबत 23 ऑगस्टला शबरीमला दर्शनासाठी जाण्यासाठी परवानगी देण्याचा अंतरिम आदेश जारी केला जाऊ शकतो." यापूर्वी एप्रिलमध्ये असाच एक निकाल न्यायालयाने दिला होता. त्यात लसीकरण झालेल्या व्यक्तींसोबत लहान मुलांना सर्व कार्यक्रमांमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
मंदिराबद्दल काय आहे श्रद्धा?
हे मंदिर सुमारे 800 वर्ष जुने आहे. भगवान अय्यप्पा ब्रह्मचारी आहेत, त्यामुळेच मंदिरात तरुणींच्या प्रवेशावर बंदी आहे. 2006 मध्ये, मंदिराचे मुख्य ज्योतिषी परप्पनगडी उन्नीकृष्णन म्हणाले होते की, एका तरुणीने मंदिरात प्रवेश केल्यामुळे अय्यपा रागावलेत. ते आपली शक्ती गमावत आहे. त्यानंतर कन्नड अभिनेता प्रभाकरची पत्नी जयमाला यांनी अयप्पाच्या मूर्तीला स्पर्श केल्याचा दावा केला होता.