काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरूच; आतापर्यंत 13 वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 04:19 PM2019-05-27T16:19:53+5:302019-05-27T16:21:39+5:30

अनेक प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधींकडे पाठवले राजीनामे

13 Senior Congress Leaders Offers To Resign From Their Post After defeat in lok sabha Election Results | काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरूच; आतापर्यंत 13 वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे

काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरूच; आतापर्यंत 13 वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असताना आता विविध राज्यांचे प्रभारीदेखील राजीनामे देऊ लागले आहेत. आसामपासून पंजाबपर्यंत आणि मध्य प्रदेशपासून राजस्थानपर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत पक्षाच्या 13 वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे राजीनामे राहुल गांधींकडे पाठवले आहेत. 

गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची धुरा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. मात्र काँग्रेसनं त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. आपली जागा घेऊ शकेल अशी व्यक्ती शोधा, अशा सूचना राहुल यांनी पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसमधील 13 बड्या नेत्यांनी राहुल यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजीनामे दिले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निवडणूक निकाल आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. 

अशोक चव्हाण यांच्यानंतर पंजाब काँग्रसचे अध्यक्ष सुनील जाखड, झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार आणि आसाम काँग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोरांनी सोमवारी त्यांचे राजीनामे राहुल यांना पाठवले. जाखड यांनी गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपाचे सनी देओल यांच्याकडून पराभूत झाले. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीदेखील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. याशिवाय काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीदेखील राजीनामे दिले आहेत. 
 

Web Title: 13 Senior Congress Leaders Offers To Resign From Their Post After defeat in lok sabha Election Results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.