बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 09:03 AM2020-06-25T09:03:39+5:302020-06-25T09:16:13+5:30
जवळपास 26 टक्के खासदारांवर गंभीर गुन्हेगारीचे खटले प्रलंबित आहेत.
नवी दिल्ली - राज्यसभेमध्ये 2020 वर्षात नव्याने आलेल्या 62 खासदारांपैकी 16 खासदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. जवळपास 26 टक्के खासदारांवर गंभीर गुन्हेगारीचे खटले प्रलंबित आहेत. खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांतून याबाबत माहिती मिळत आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने केलेल्या विश्लेषणानंतर ही माहिती समोर आली आहे. 16 आमदारांपैकी 11 जणांवर हत्या, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि दरोडा यासारखे गुन्हे आहेत. एका खासदाराविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन खासदारांनी त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे.
तीन खासदारांनी महिलांवरील गुन्हेगारीसंबंधित खटल्यांबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे. तर एका खासदाराने बलात्काराच्या घटनेची माहिती दिली आहे. भाजपाच्या 18 खासदारांपैकी 2, काँग्रेसचे 9 पैकी 3 खासदार, राष्ट्रवादीचे दोन्ही खासदार, वायएसआयआरचे 4 पैकी 2 आणि बीजेडीके 25 टक्के, तृणमूल काँग्रेसचे 25 टक्के, जेडीयूचे 50 टक्के, द्रमुकचे 33 टक्के, आरजेडीचे 50 टक्के खासदार आहेत. मध्य प्रदेशातील 3 पैकी 1 खासदार, राजस्थानातील एक आणि झारखंडमधील 2 खासदारांनी त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची माहिती दिली आहे.
नव्याने निवडून आलेल्या खासदारांपैकी 84 टक्के म्हणजेच 52 खासदार हे करोडपती आहेत. ज्यामध्ये वायएसआर काँग्रेसचे अल्लाअयोध्यारामी रेड्डी सर्वात धनाढ्य खासदार आहेत. त्यांच्याकडे तब्बल 25,7775,79,180 रुपये एवढी संपत्ती आहे. त्यानंतर याच पक्षाचे नाथवानी परिमल हे दुसरे सर्वात श्रीमंत खासदार असून त्यांच्याकडे देखील तब्बल 3,9683,96,198 रुपये एवढी संपत्ती आहे.
CoronaVirus News : श्वासाने कोरोनावर नियंत्रण मिळवता येतं?, जाणून घ्या नेमकं कसं https://t.co/tIJoivvh3U#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 24, 2020
काँग्रेसकडून भाजपामध्ये आलेले ज्योतिरादित्य सिंधिया हे तिसर्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 3,79,03,29,144 रुपयांची संपती आहे. भाजपाच्या महाराजा संजोओबा लिसेम्बा यांच्याकडे सर्वात कमी 5,48,594 रुपये एवढी मालमत्ता आहे. तसेच भाजपाचे अशोक गस्ती यांची 19,40,048 रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या अर्पिता घोष तिसर्या क्रमांकावर आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : लढ्याला यश! 'या' औषधांच्या मदतीने लवकरच कोरोनावर मात करता येणारhttps://t.co/63o5S02YGV#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 22, 2020
महत्त्वाच्या बातम्या
'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहितीय का?, बिग बींनी शोधलं उत्तर
"मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किमती अनलॉक केल्या"
"विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं"; 'तो' फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला
धक्कादायक! तब्बल 62 एन्काउंटर करणाऱ्या माजी DSP ची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं...
CoronaVirus News : देशात कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने पुन्हा रेकॉर्ड मोडला