क्रिकेट सामन्यात 'मॅन ऑफ दी मॅच' म्हणून खेळाडूला दिलं ५ लिटर Petrol; जाणून घ्या कारण
By स्वदेश घाणेकर | Published: March 1, 2021 12:17 PM2021-03-01T12:17:16+5:302021-03-01T12:18:54+5:30
5 litre petrol presented as man of the match रविवारी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला आणि त्यात सनरायझर्स ११ व शगीर तारिक ११ अशा दोन संघांमध्ये सामना झाला.
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे क्रिकेट सामन्यादरम्यान मॅन ऑफ दी मॅच म्हणून खेळाडूला दिलेल्या पुरस्काराची सध्या जोरदार चर्चा आहे. पुरस्कार म्हणून खेळाडूला चक्क पाच लीटर पेट्रोल ( 5 litre Petrol) देण्यात आल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या. पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किंमतींचा निषेध केला जात आहे. विरोधी पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत.
रविवारी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला आणि त्यात सनरायझर्स ११ व शगीर तारिक ११ अशा दोन संघांमध्ये सामना झाला. सनरायझर्स ११ने हा सामना जिंकला, सलाउद्दीन अब्बासीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार देण्यात आला. त्याला मॅन ऑफ दी मॅच म्हणून अब्बासीला ५ लीटर पेट्रोलचा कॅन देण्यात आला.
काँग्रेस नेता मनोज शुक्ला यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि इंधन दरवाढीचा निषेध म्हणून त्यांनी ही युक्ती लढवली. मनोज शुक्ला म्हणाले की,'ज्या वेगानं पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत आहेत, ते पाहून आयोजन समितीनं मॅन ऑफ दी मॅच जिंकणाऱ्या खेळाडूला ५ लीटर पेट्रोल देण्याचा निर्मय घेतला होता. इंधन दरवाढ अशीच होत राहिली तर लोकांचा खिशाला आणखी कात्री लागेल.''
इंधन दरवाढ आणि महागाई हे समीकरण कसे काम करते?
इंधन दरवाढ आणि महागाई याचा थेट संबंध आहे. कोणतीही वस्तू असो, फळे, भाज्या, धान्य किंवा कपडे असाेत. प्रत्येक गोष्टीसाठी वाहतूक आवश्यक आहे. वाहतूक क्षेत्राचा कच्चा माल डिझेल आहे. वाहतूक व्यवसायात गाड्यांच्या ६० टक्के खर्च डिझेलचा असतो. डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इतकेच नव्हे तर दरवाढीची मर्यादा ओलांडली गेली आहे. यामुळे डिझेल आणखी महाग होते. त्याचा वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो. या वस्तूंचे भाव वाढतात.