आरक्षणाची ५०% मर्यादा काढणार; राहुल गांधी यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 06:42 AM2024-02-06T06:42:52+5:302024-02-06T06:43:29+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे भारत जोडो न्याय यात्रेत आश्वासन
रांची : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास देशव्यापी जात-आधारित जनगणना करण्याचे आणि आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा काढून टाकण्याचे आश्वासन दिले. झारखंडमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या चौथ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी रामगढ येथील महात्मा गांधी चौकातून यात्रेला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते.
यादरम्यान राहुल गांधींनी सायकलवरून कोळसा घेऊन जाणाऱ्या तरुणांची भेट घेतली. यावेळी त्यांनी २०० किलो कोळसा भरलेली सायकल चालवली. त्यांनी त्या मजुरांना पीकअप व्हॅन देण्याचे आश्वासन दिले.
भारताच्या उभारणीचे चाकही थांबेल...
nसभेला संबोधित करण्यापूर्वी राहुल गांधींनी २०० किलो कोळसा भरलेली सायकल चालवली आणि त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. सायकलवर २०० किलो कोळसा घेऊन दररोज ३०-४० किलोमीटर ती चालवणाऱ्या या तरुणांची कमाई नाममात्र आहे.
nत्यांच्यासोबत सायकल चालवल्याशिवाय त्यांच्या समस्या समजून घेता येणार नाहीत. या तरुण कामगारांचे जीवनचक्र मंदावले तर भारताच्या उभारणीचे
चाकही थांबेल.’