3 दिवसांत 800 कार्यकर्त्ये ताब्यात; उद्या काँग्रेस देशभरातील राजभवनांचा घेराव घालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 03:58 PM2022-06-15T15:58:41+5:302022-06-15T15:58:57+5:30

Congress Protest: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून सलग तिसर्‍या दिवशी चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून प्रचंड विरोध होत आहे.

800 congress workers detained in 3 days; Tomorrow Congress will lay siege to Raj Bhavan across the country | 3 दिवसांत 800 कार्यकर्त्ये ताब्यात; उद्या काँग्रेस देशभरातील राजभवनांचा घेराव घालणार

3 दिवसांत 800 कार्यकर्त्ये ताब्यात; उद्या काँग्रेस देशभरातील राजभवनांचा घेराव घालणार

Next

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून सलग तिसर्‍या दिवशी चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांच्या वतीने पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांवर केलेल्या कारवाईवर जोरदार हल्ला चढवला. दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.

देशभरात निदर्शने होणार
सुरजेवाला म्हणाले की, दिल्ली पोलिसांकडून गुंडगिरी केली जात आहे. हे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही. त्याचा हिशोब द्यावा लागेल. आम्ही एफआयआर नोंदवण्याची मागणी करत आहोत. त्याचबरोबर शिस्तभंगाचीही चौकशी सुरू करावी. आज काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या देशातील सर्व राजभवनांचा घेराव करून परवा जिल्हास्तरावर जोरदार निदर्शने होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

'सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या जातील'
पोलिसांच्या कारवाईवर रणदीप सुजरेवाला यांनी ट्विट केले की, दहशत आणि अत्याचाराचा हा नंगा नाच, संपूर्ण देश पाहत आहे. मोदीजी, अमित शाह आणि दिल्ली पोलीस, सर्वकाही लक्षात ठेवलं जाईल. मुख्यमंत्री, खासदार, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते आणि महिलांवर अत्याचार केल्यानंतर आता देशातील प्रमुख विरोधी असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयावर हल्ला केला गेला, असंही ते म्हणाले.

150 जणांना ताब्यात घेण्यात आले
तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष कायदा आणि सुव्यवस्था डीपी हुड्डा म्हणाले की, आजही काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आले आहेत, आम्ही सांगूनही काही लोकांनी ऐकले नाही. विविध ठिकाणांहून 150 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, तीन दिवसांत आतापर्यंत सुमारे 800 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हुड्डा म्हणाले की, आम्ही काँग्रेसच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते की, तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर तुम्ही जंतरमंतरवर जाऊ शकता, परंतु त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यांचा आरोप काहीही असला तरी तो चुकीचा आहे. 

Web Title: 800 congress workers detained in 3 days; Tomorrow Congress will lay siege to Raj Bhavan across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.