सरकार म्हटलं, बंगला खाली करा; एका महिलेने चक्क ४ मजली इमारत राहुल गांधींच्या नावावर केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 17:03 IST2023-04-01T16:59:35+5:302023-04-01T17:03:57+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागील आठवड्यात खासदारकी रद्द केली.

सरकार म्हटलं, बंगला खाली करा; एका महिलेने चक्क ४ मजली इमारत राहुल गांधींच्या नावावर केली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागील आठवड्यात खासदारकी रद्द केली. यानंतर गांधी यांचा सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीसही देण्यात आली. आता दिल्लीतील एका महिलेने आपली चार मजली इमारत राहुल गांधींच्या नावावर केली आहे. राजकुमारी गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. दिल्लीतील मंगोलपुरी भागात एक ४ मजली घर राहुल गांधी यांच्या नावावर केले आहे. राजकुमारी गुप्ता या दिल्ली काँग्रेस सेवादलाशी संबंधित आहेत. लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसने 'माझ घर राहुल गांधींचे घर' असा प्रचार केला. राहुल गांधी यांना गेल्या आठवड्यात लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, गृहनिर्माण समितीने गांधींना १२ तुघलक लेन येथील त्यांचा अधिकृत बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवली आहे.
... जेव्हा IAS अधिकारी सौम्या वृद्धाची समस्या ऐकण्यासाठी रस्त्यावर बसतात
गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने २३ मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवले आणि त्यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीसाठी २०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. दुसऱ्या दिवशी २४ मार्च रोजी त्यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले. अपात्र ठरलेल्या सदस्याला त्यांचे सदस्यत्व संपुष्टात आल्यापासून एका महिन्याच्या आत अधिकृत बंगला रिकामा करावा लागतो.