स्व. इंदिरा गांधींच्या मतदार संघात भारत जोडो यात्रेत दुर्घटना; चार कार्यकर्त्यांना बसला विजेचा शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 11:48 AM2022-10-16T11:48:13+5:302022-10-16T11:50:30+5:30

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. 3750 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर हा प्रवास जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये संपेल.

Accident in Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra; Four workers were electrocuted | स्व. इंदिरा गांधींच्या मतदार संघात भारत जोडो यात्रेत दुर्घटना; चार कार्यकर्त्यांना बसला विजेचा शॉक

स्व. इंदिरा गांधींच्या मतदार संघात भारत जोडो यात्रेत दुर्घटना; चार कार्यकर्त्यांना बसला विजेचा शॉक

googlenewsNext

काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. त्यांच्या यात्रेला मोठी गर्दी होत आहे. असे असताना बळ्ळारीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. या यात्रेतील ४ कार्यकर्त्यांना विजेचा शॉक लागला आहे. या सर्वांवर प्राथमिक उपचार करून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. 

ही दुर्घटना आज, रविवारी सकाळी कर्नाटकच्या बळ्ळारीमध्ये घडली. या ठिकाणी आजच्या यात्रेची सुरुवात झाली होती, मौका नावाच्या गावात पोहोचली असता काही कार्यकर्त्यांना शॉक लागला. पक्षाचा झेंडा घेतलेले कार्यकर्ते निपचित पडल्याने सुरवातीला गोंधळ उडाला. मात्र, एक तास बाजुला दिसल्याने नेमके काय घडलेय ते इतरांच्या लक्षात आले. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि  रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात पाठवले आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. 3750 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर हा प्रवास जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये संपेल. यात्रेत सहभागी असलेले सर्व सदस्य या कालावधीत 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जातील.

Web Title: Accident in Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra; Four workers were electrocuted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.