राहुल गांधी रिलॅक्स मूडमध्ये; 'पीडी'सोबत कारमधून फेरफटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 12:40 PM2019-05-30T12:40:51+5:302019-05-30T12:51:46+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे. पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहण्यास नकार दिला आहे. तसेच ते गेले काही दिवस प्रसार माध्यमांपासूनही दूर आहेत. मात्र सध्या राहुल गांधींसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या एका पोस्टनुसार राहुल हे आपल्या पाळीव कुत्र्यासोबत गाडीतून फिरताना दिसत आहेत.
राहुल गांधींच्या पाळीव कुत्र्याचं नाव पीडी असं आहे. राहुल पीडीसोबत फिरताना आणि त्याच्याबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. लोकसभेतील पराभवानंतर काही दिवस राहुल सर्व गोष्टींपासून लांब होते. मात्र आता राहुल यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी आपल्या लाडक्या पीडीला फिरायला घेऊन जाताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये राहुल गांधी हे कार चालवताना व मागच्या सीटवर पीडी हा त्यांचा कुत्रा बसलेला दिसत आहेत.
राहुल गांधी आणि पीडीच्या या व्हायरल फोटोवर नेटीझन्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तो फोटो आवडल्याचं सांगितलं तर काहींनी राहुल यांना त्यावरून ट्रोल केलं आहे. राहुल यांनी दोन वर्षापूर्वी पीडीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये पीडी व राहुल यांची चांगलीच केमिस्ट्री असल्याचं समोर आलं होतं.
Ppl been asking who tweets for this guy..I'm coming clean..it's me..Pidi..I'm way 😎 than him. Look what I can do with a tweet..oops..treat! pic.twitter.com/fkQwye94a5
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 29, 2017
काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारल्यास राहुल गांधींना मिळणार 'ही' जबाबदारी ?
लोकसभेत काँग्रेसचा नेता निवडण्यासाठी एक जून रोजी काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात ही बैठक होणार आहे. यावेळी पुढील लोकसभेच्या सत्रासाठीची रणनिती ठरविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. राहुल यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारल्यास त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत देखील 2014 प्रमाणे विरोधी पक्ष नेते पद मिळणार नाही. त्यातच आता लोकसभेचा नेता निवडण्यासाठी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सध्याच्या घडीला काँग्रेसकडे प्रभावी चेहऱ्यांची कमतरता आहे.
काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला राहुल गांधींनी फेटाळला
महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, हा काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला स्वत: राहुल गांधी यांना अमान्य केल्याचे दिसत असून, ते राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे, तर राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांचे फोन घेणेही आता बंद केले आहे. पक्षाच्या 25 व 27 मे रोजी झालेल्या बैठकांनंतर राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांना भेटही दिलेली नाही.
लोकसभा हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक धक्का; 64 कोटींची संपत्ती होणार जप्त
लोकसभा निवडणुकीत हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक झटका बसला आहे. ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी हरियाणाच्या पंचकुला येथील 64.93 कोटींची संपत्ती ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ईडीने नुकतेच रॉबर्ट वड्रा यांचा जामीन रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. 2005 मध्ये हरियाणाच्या तत्कालीन भूपेंद्र सिंह हुड्डा सरकारने कायदे धाब्यावर बसवून ही संपत्ती गांधी परिवाराच्या मालकीच्या एसोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ला देण्यात आली होती. ही संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ध न्यायिक प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. हे प्रकरण पंचकुलामध्ये एजेएलला हिंदी वृत्तपत्र नॅशनल हेराल्ड आणि नवजीवनच्या प्रकाशनासाठी जमीन देण्याशी संबिधीत आहे. एजेएलवर कथितरित्या गांधी परिवार आणि काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचे नियंत्रण असल्याचा आरोप होत आहे.