Congress change Twitter DP: पंतप्रधान मोदींनंतर, आता काँग्रेसनंही बदलला ट्विटरचा प्रोफाईल फोटो, लिहिला हा खास मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 02:53 PM2022-08-03T14:53:59+5:302022-08-03T14:54:54+5:30
काँग्रेसने तिरंग्यासह असलेले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर, आता काँग्रेसनेही आपल्या सोशल मीडिया हँडलवरील प्रोफाईल फोटो बदलला आहे. काँग्रेसने तिरंग्यासह असलेले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांचा फोटो लावला आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी काँग्रेसने 'हर घर तिरंगा' मोहिमेंतर्गत प्रोफाईल फोटो बदलला आहे. याच बरोबर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) तसेच प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही, आपल्या प्रोफाईल फोटोमध्ये पंडित नेहरूंचा तिरंग्यासोबतचा फोटो लावला आहे.
काँग्रेसने पंडित नेहरूंच्या फोटोसोबत शेअर केला खास मेसेज -
तिरंग्यासोबतचा पंडित जवाहरलाल नेहरु यांचा फोटो शेअर करत काँग्रेसने लिहिले आहे, "तिरंगा आमच्या हृदयात आहे, रक्ताच्या स्वरुपात आमच्या नसानसात आहे. 31 डिसेंबर, 1929 रोजी पंडित नेहरू यांनी रावी नदीच्या किनाऱ्यावर तिरंगा फडकवताना म्हटले होते, की 'आता तिरंगा फडकावला आहे. हा झुकायला नको.' चला आपण सर्व जण देशाच्या अखंड एकतेचा संदेश देणाऱ्या या तिरंग्याला आपली ओळख बनवू या. जय हिंद. #MyTirangaMyPride"
तिरंगा हमारे दिल में है, लहू बनकर हमारी रगों में है। 31 दिसंबर, 1929 को पंडित नेहरू ने रावी नदी के तट पर तिरंगा फहराते हुए कहा था, ‘अब तिरंगा फहरा दिया है, ये झुकना नहीं चाहिए'
— Congress (@INCIndia) August 3, 2022
आइए हम सब देश की अखंड एकता का संदेश देने वाले इस तिरंगे को अपनी पहचान बनाएं।जय हिंद#MyTirangaMyPridepic.twitter.com/NwgIMUHpp4
राहुल आणि प्रियंका गांधींनीही शेअर केला फोटो -
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो शेअर करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लिहिले, 'देशाची शान आहे, आपला तिरंगा. प्रत्येक हिंदुस्तानी व्यक्तीच्या हृदयात आहे, आपला तिरंगा.' तसेच, प्रियांका गांधी(Priyanka Gandhi) यांनी, 'विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा,' असे लिहिले आहे.
देश की शान है, हमारा तिरंगा
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 3, 2022
हर हिंदुस्तानी के दिल में है, हमारा तिरंगा pic.twitter.com/lhm0MWd3kM
“विजयी विश्व तिरंगा प्यारा,
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 3, 2022
झंडा ऊँचा रहे हमारा” pic.twitter.com/KiWa7EP5qM
पंतप्रधान मोदींनी केलं होतं प्रोफाईलवर तिरंगा लावण्याचं आवाहन -
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी आपल्या 'मन की बात'च्या 91व्या अॅपिसोडमध्ये देशवासीयांना 2 ऑगस्टपासून 15 ऑगस्टदरम्यान आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा ध्वज प्रोफाईल फोटो म्हणून ठेवण्याचे आवाहन केले होते. एवढेच नाही, तर 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' जन आंदोलनात परिवर्तित होत आहे, असेही पीएम मोदी यांनी म्हटले होते.