पंजाबनंतर आता “ऑपरेशन राजस्थान”?; काँग्रेस ठेवतंय भाजपाच्या पाऊलावर पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 03:49 PM2021-09-20T15:49:47+5:302021-09-20T15:50:22+5:30

सचिन पायलट(Sachin Pilot) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यात तब्बल २ तास भेट झाली. १७ सप्टेंबरला दिल्लीत या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली

After Punjab, now "Operation Rajasthan" ?; Congress Sachin Pilot meet Rahul Gandhi | पंजाबनंतर आता “ऑपरेशन राजस्थान”?; काँग्रेस ठेवतंय भाजपाच्या पाऊलावर पाऊल

पंजाबनंतर आता “ऑपरेशन राजस्थान”?; काँग्रेस ठेवतंय भाजपाच्या पाऊलावर पाऊल

Next

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यापासून भाजपाने ३ राज्यांचे मुख्यमंत्री बदलले त्यानंतर आता काँग्रेसदेखील हीच रणनीती वापरताना दिसत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री बदलून नवं धक्कातंत्र वापरलं आता राजस्थान काँग्रेसमध्येही हेच घडणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण गेल्या २ दिवसांपासून राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट दिल्ली दरबारी आहेत. याठिकाणी पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.

सचिन पायलट(Sachin Pilot) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यात तब्बल २ तास भेट झाली. १७ सप्टेंबरला दिल्लीत या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली. पायलट आणि राहुल गांधी यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे कारण राजस्थानात बंडखोरी केल्यानंतर मागील १ वर्षात पहिल्यांदाच सचिन पायलट आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. या भेटीत ३ मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितले. त्यात राजस्थानमध्ये संघटनेत बदल करावा ही प्रमुख मागणी होती. तसेच मंत्रिमंडळ बदल आणि पक्षात पायलट यांची भूमिका यावर चर्चा झाली.

सचिन पायलट समर्थकांचा दावा आहे की, राजस्थानात पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पायलट यांना संधी द्यावी. त्यानंतर अशोक गहलोत मंत्रिमंडळात फेरबदल करून संघटनेच्या काही महिन्यात बदल करण्यात यावेत. पार्टी हायकमांडही गहलोत मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांची सुट्टी करून नवी मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या बदलासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या प्रकृतीत सुधारणा आणि पुन्हा कार्यालयीन कामकाजाच्या सुरु होण्याची पक्ष वाट पाहतोय.

प्रमोद कृष्णन यांच्या ट्विटनं वाढवली उत्सुकता

राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी स्पष्ट केलंय की, अशोक गहलोत बरे झाल्यानंतर राजस्थानात बदल करणार आहोत. काय करायचं हे सगळं तयार आहे. प्रियंका गांधी यांच्या जवळचे सहकारी आचार्य प्रमोद कृष्णन यांनी एका ट्विटमधून संकेत दिलेत की, पंजाबमधील वारं राजस्थान आणि छत्तीसगडमधील वातावरण बिघडवू शकतात. परंतु AICC मधल्या सूत्रांचा दावा आहे की, पंजाबप्रमाणे राजस्थानात कुठलेही मोठे बदल पुढील वर्ष मार्चपर्यंत केले जाणार नाहीत. परंतु तोपर्यंत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारला पुन्हा संधी दिली जाईल. मात्र संघटनेत आणि मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येतील असं त्यांनी दावा केला.  

Web Title: After Punjab, now "Operation Rajasthan" ?; Congress Sachin Pilot meet Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.