Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 10:38 PM2024-07-01T22:38:24+5:302024-07-01T22:44:06+5:30
राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.
लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै) लोकसभेत पुन्हा अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.
राहुल गांधी यांच्या या दाव्यावर, आता शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील बुलढाणा येथील होतात्म आलेले पहिले अग्निवीर अक्षय गवते, यांचे वडील लक्ष्मण गवते यांनी यासंदर्भात बोलताना आपल्याला एकूण 1 कोटी 10 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई मिळाल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्या दाव्यावर काय म्हणाले राजनाथ सिंह? -
राहुल गांधी यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात तत्कळ उत्तर दिले. राजनाथ सिंह म्हणाले, शहीद अग्निवीराच्या कुटुंबाला मदत करण्यात आली आहे. जगातील सर्वात उंचावरील उद्ध क्षेत्र असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेले अग्निवीर अक्षय गवते यांना देशाची सेवा करताना होतात्म्य आले होते.
अक्षय गवते यांना यांना मृत्यूनंतर गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आले होते. अग्निवीर अक्षय महाराष्ट्रातील बुलढाणा तालुक्यातील पिपळगाव सराई येथील रहिवासी होते. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात सियाचिनमध्ये तैनात असलेल्या वीस वर्षीय गवाते यांना हार्ट अॅटॅक आला होता. यानंतर उपचारावेळी त्यांचे निधन झाले होते.