Owaisi Suggestion On Mosque: ...म्हणून मशिदींवर लावण्यात यावेत हाय रिझॉल्यूशन कॅमरे, असदुद्दीन ओवेसींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 10:50 AM2022-05-08T10:50:40+5:302022-05-08T10:51:38+5:30

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, सर्व धार्मिक स्थळे, विशेषतः मशिदी आणि दर्ग्यांमध्ये हाय रिझॉल्यूशन कॅमेरे लावण्यात यावेत.

AIMIM Asaduddin owaisi suggests to install high resolution cameras at religious places | Owaisi Suggestion On Mosque: ...म्हणून मशिदींवर लावण्यात यावेत हाय रिझॉल्यूशन कॅमरे, असदुद्दीन ओवेसींची मागणी

Owaisi Suggestion On Mosque: ...म्हणून मशिदींवर लावण्यात यावेत हाय रिझॉल्यूशन कॅमरे, असदुद्दीन ओवेसींची मागणी

googlenewsNext

मशिदींवर हाय रिझॉल्यूशन कॅमेरे लावण्यात यावेत आणि जेव्हा केव्हा एखादी धार्मिक मिरवणूक संबंधित भागांतून जाईल, तेव्हा तिचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे. जेणेकरून उपद्रव करणाऱ्यांची ओळख पटवता येईल, असे एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी म्हटले आहे.

धार्मिक मिरवणूक काढताना थेट प्रक्षेपण व्हावे - 
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, सर्व धार्मिक स्थळे, विशेषतः मशिदी आणि दर्ग्यांमध्ये हाय रिझॉल्यूशन कॅमेरे लावण्यात यावेत. जेव्हा एखादी धार्मिक मिरवणूक या धार्मिक स्थळांवरून जाईल, तेव्हा संबंधितांनी त्यांच्या सोशल मीडिया वेबसाइटवरून तिचे थेट प्रक्षेपण करायला हवे.

लोकांना सत्य समजायला हवे - 
जेव्हा एखादी  धार्मिक मिरवणूक काढली जाते. तेव्हा, त्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण बघितल्यानंतर, लोकांना सत्य समजते. सांप्रदायिक घटनांदरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी नियमितपणे मुसलमानांना जबाबदार धरलेजाते, असेही ओवेसी म्हणाले.

टीआरएसला कसे आव्हान देणार? -
यावेळी ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या तेलंगणा दौऱ्यासंदर्भात बोलताना ओवेसी यांनी एका व्हिडिओचा हवाला दिला, या व्हिडिओत राहुल यांनी कथितपणे, आपल्या भाषणाची थीम काय आहे? असा प्रश्न केला आहे. ओवेसी म्हणाले, 'जर तलंगाणातील जनतेला आपल्याला काय संदेश द्यायचा आहे आणि तेलंगाणातील जनतेने आपल्याला कशासाठी पाठिंबा द्यावा, हेच माहीत नसेल? तर आपण टीआरएसला कसे आव्हान देऊ शकाल.

 

Web Title: AIMIM Asaduddin owaisi suggests to install high resolution cameras at religious places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.