‘सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी’, राहुल गांधींचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 06:33 AM2024-01-31T06:33:08+5:302024-01-31T06:33:55+5:30
Rahul Gandhi: सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्ष नेतृत्वासमोर असा प्रस्ताव ठेवला आहे.
- आदेश रावल
नवी दिल्ली - सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्ष नेतृत्वासमोर असा प्रस्ताव ठेवला आहे. सर्व वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, सरचिटणीस आणि मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. त्यामुळे काँग्रेसला जास्तीत जास्त जागा जिंकणे सोपे होणार आहे, असे ते म्हणाले.
मात्र, या प्रस्तावानंतरही उत्तर भारतातील बहुतांश नेते असे आहेत, ज्यांना लोकसभा निवडणूक लढवायची नाही. थोडा दबाव पडला की ते यू टर्न घेतात : राहुल गांधी
पूर्णिया : बिहारमधील शेतकरी आर्थिक अन्यायाचे बळी पडत आहेत. आम्ही त्यांच्या हितासाठी लढत राहू. नितीश कुमार थोडाही दबाव सहन करू शकत नाहीत. ते लगेचच घुमजाव करतात. दबाव आला की पारडे बदलतात, असे ते म्हणाले.