Amit Shah Attacks Congress : '2024 मध्ये दुर्बिणीतून पाहिलं तरी काँग्रेस दिसणार नाही' अमित शहांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 07:13 PM2023-02-20T19:13:41+5:302023-02-20T19:13:49+5:30
'राहुल गांधी काँग्रेसचे नेते झाले, तेव्हापासून पक्षाच्या नेत्यांची पातळी खालावली आहे.'
Amit Shah Attacks Congress: नागालँड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (20 फेब्रुवारी) मून टाऊनमध्ये भाजपची सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. '2024 मध्ये दुर्बिणीतून पाहिलं तरी काँग्रेस दिसणार नाही,' अशी टीका शहा यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांवर असभ्य भाषा वापरल्याचा आरोपही केला.
जाहीर सभेला संबोधित करताना गृहमंत्री शहा म्हणाले, "राहुल गांधी जेव्हापासून काँग्रेस पक्षाचे नेते झाले, तेव्हापासून काँग्रेस पक्षाच्या नेत्याची पातळी खालावली आहे. पंतप्रधानांसाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेचा मी निषेध करतो. आज काँग्रेसच्या प्रवक्त्याने मोदींबद्दल अपशब्द वापरले आहेत. राहुल गांधी मोदींसाठी अपशब्द वापरतात. 2024 मध्ये दुर्बिणीतूनही पाहिले तरी काँग्रेस पक्ष दिसणार नाही. संपूर्ण देशात काँग्रेसला कुठेही यश मिळत नाही,' अशी टीका त्यांनी केली.
#WATCH | Congress leader Pawan Khera was seen in a video insulting Prime Minister Narendra Modi's name and his father (17.02) pic.twitter.com/24LEjqcD1c
— ANI (@ANI) February 20, 2023
दरम्यान, सोमवारी (20 फेब्रुवारी) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करताना दिसत होते. याबाबत अमित शहा यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला.
अमित शहांचे नागालँडला आश्वासने
रॅलीच्या सुरुवातीला गृहमंत्री शहा म्हणाले की, 'आज आम्ही पहिल्यांदाच या गावात आलो आहोत. आम्ही आज रात्री इथेच राहू. जर नागालँडमध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाले तर आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू. भारत सरकार नागालँडसोबत आहे. नागालँडच्या समस्येवर तोडगा निघणे फार दूर नाही. मोदीजींनी या भागातील 70 टक्के समस्यांचे निराकरण कमी केले आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचे मंत्रालय नागालँडसाठी चांगले काम करत आहे. नागालँडचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.' नागालँड निवडणुकीनंतर राज्यात एडीपीपी-भाजप युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे शहा म्हणाले.