'काँग्रेस 20 वर्षांपासून राहुल बाबाला लॉन्च करत आहे', अमित शहांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 05:39 PM2023-06-29T17:39:50+5:302023-06-29T17:40:28+5:30

Amit Shah Bihar Rally: 'पंतप्रधान मोदी जगात कुठेही गेले तरी मोदी-मोदीचा नारा ऐकू येतो.'

Amit Shah Bihar Rally: 'Congress has been launching Rahul gandhi for 20 years', Amit Shah criticizes him | 'काँग्रेस 20 वर्षांपासून राहुल बाबाला लॉन्च करत आहे', अमित शहांची बोचरी टीका

'काँग्रेस 20 वर्षांपासून राहुल बाबाला लॉन्च करत आहे', अमित शहांची बोचरी टीका

googlenewsNext

Amit Shah Bihar Rally: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी बिहारच्या लखीसरायमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली. नितीश कुमारांचे पलटू बाबू' असे वर्णन करत शहा म्हणाले की, नितीश कुमार पंतप्रधान मोदींमुळेच बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. यासोबतच शहांनी केंद्र सरकारचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षातील कामांची माहिती दिली. 

काँग्रेस राहुल बाबाला...
काँग्रेस हा एक विचित्र पक्ष आहे. राजकारणात पहिल्यांदाच एखाद्या नेत्याला लॉन्च केले जाते. आम्ही अशा पक्षातून आलो आहोत, जिथे पक्षाकडून नेत्याला लॉन्च केले जात नाही, तर जनताच नेत्याला लॉन्च करते. पण काँग्रेस राहुल बाबाला 20 वर्षांपासून लॉन्च करत आहे. यावेळीदेखील काँग्रेसने त्यांना पाटण्यात लॉन्च करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

मोदींनी कलम 370 हटवली
याआधी पाक प्रेरीत दहशतवादी हल्ले करायचे, तेव्हा सोनिया-मनमोहन सरकार उत्तर देत नव्हते, दिल्लीत मौनी बाबा बनून बसायचे. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात पुलवामा आणि उरी येथे हल्ले झाले, तेव्हा मोदींनी 10 दिवसात स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारले. काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, ममता या सर्वांनी कलम 370 लहान मुलाप्रमाणे आपल्या मांडीवर बसवले. ते म्हणायचे कलम 370 हटवल्यास काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहू लागतील. पण राहुल बाबा, मोदींनी कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहणे तर दूरच, पण साधा दगड उचलायचीही हिंमत कोणी केली नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

9 वर्षे गौरवाची...
मोदी सरकारची ही नऊ वर्षे भारताच्या वैभवाची, गौरवाची वर्षे आहेत. पंतप्रधान मोदी कुठेही जातात, मग ते अमेरिका असो, इंग्लंड असो, फ्रान्स असो की इजिप्त...तुम्हाला 'मोदी, मोदी'चा नारा ऐकू येतो. ते नुकतेच यूएसला गेले, काही राष्ट्रप्रमुखांनी त्यांची भेट मागितली, काहींनी त्यांचा ऑटोग्राफ घेतला, तर काहींनी आशीर्वादासाठी त्यांचे पाय स्पर्श केले. जगभरातील पंतप्रधान मोदींबद्दलचा हा आदर केवळ त्यांचा किंवा भाजपचाच नाही तर करोडो भारतीयांचा आहे..., असंही शहा म्हणाले.


कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Amit Shah Bihar Rally: 'Congress has been launching Rahul gandhi for 20 years', Amit Shah criticizes him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.