राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 03:09 PM2024-09-27T15:09:20+5:302024-09-27T15:10:27+5:30

Amit Shah on Rahul Gandhi : "मी शब्द देतो, जोपर्यंत संसदेत भाजपचा एकही खासदार आहे, तोपर्यंत आरक्षण संपणार नाही."

Amit Shah on Rahul Gandhi "Does Rahul Baba do you know the full form of MSP and Kharif-Rabi crops? Amit Shah's criticism | राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका

राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका

Amit Shah on Rahul Gandhi : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रेवाडी येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. "काँग्रेस नेत्यांनी अग्निवीर योजनेबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. आज देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, जम्मू-काश्मीर सुरक्षित आहे, यात हरियाणाच्या सैनिकांचे त्याग आणि शौर्य सामील आहे," असे अमित शाह म्हणाले.

काँग्रेसने एमएसपीवर खोटे बोलणे बंद करावे
शाह पुढे म्हणतात, "हरियाणात काँग्रेसची सत्ता असताना कट, कमिशन आणि भ्रष्टाचारावर भर असायचा. व्यापारी, दलाल आणि जावयाचे राज्य होते. पण, भाजप सरकारमध्ये ना डीलर उरले ना दलाल, जावयाचा प्रश्नच नाही. राहुल गांधींना कुणीतरी सांगितले की, एमएसपीच्या मुद्द्यावरुन मते मिळतात. पण, मूळात राहुल यांना एमएसपीचा फुल फॉर्म माहितेय का? खरीप आणि रब्बी पिके कोणती असतात, त्यातील फरक तरी त्यांना माहीतेय का?" 

"देशभरात सुरू असलेली काँग्रेसची सरकारे एमएसपीच्या नावाखाली शेतकऱ्यांशी खोटे बोलत आहेत. हरियाणातील भाजप सरकार एमएसपीवर शेतकऱ्यांकडून 24 पिके खरेदी करत आहे. हरियाणातील काँग्रेस नेत्यांनी एकदा सांगावे की, तुमचे देशातील कोणते सरकार 24 पीक एमएसपीवर खरेदी करते?" असा सवालही अमित शाह यांनी राहुल गांधींना यावेळी केला.

अमेरिकेतील वक्तव्यावर टीका
परदेशी भूमीवर केलेल्या वक्तव्यावरुन शाहांनी राहुल गांधींना धारेवर धरले. "राहुल परदेशात जाऊन एसटी-एससी-ओबीसी समाजाचे आरक्षण संपवू, असे सांगतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते आमच्यावर आरोप करायचे की, आम्ही आरक्षण संपवणार आहोत, पण आता ते स्वतः अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात. राहुलबाबा, तुम्ही आरक्षण कसे संपवाल? सरकार आमचे आहे. मी शब्द देतो की, जोपर्यंत संसदेत भाजपचा एकही खासदार आहे, तोपर्यंत तुम्ही आरक्षण संपवू शकत नाही," असा इशाराही शाहांनी यावेळी दिला.

वन रँक वन पेन्शनवर काँग्रेसने दिशाभूल केली
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये हरियाणामधून निवडणूक प्रचाराची सुरुवात केली, तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते की, आम्ही लष्करातील जवानांची वन रँक-वन पेन्शनची मागणी पूर्ण करू. आपल्या लष्कराचे जवान 40 वर्षांपासून ही मागणी करत होते. काँग्रेस 40 वर्षे वन रँक वन पेन्शन लागू करू शकली नाही, hC मोदींनी वन रँक वन पेन्शन लागू केली," असेही शाह म्हणाले. 

Web Title: Amit Shah on Rahul Gandhi "Does Rahul Baba do you know the full form of MSP and Kharif-Rabi crops? Amit Shah's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.