अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 18:42 IST2024-09-17T18:41:05+5:302024-09-17T18:42:30+5:30
amit shah big guarantee for agniveer jobs on army agnipath scheme haryana assembly election 2024

अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यातच केंद्रीय गृह मंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) भिवानी येथे एक प्रचारसभेला संबोधित करताना अग्निवीर योजनेसंदर्भात एक मोठा दावा केला आहे.
अमित शाह यांनी अग्निवीरांना दिली मोठी गॅरंटी -
शाह म्हणाले, राहुल गांधी आणि हुड्डा कुटुंब अग्निवीर योजनेसंदर्भात देशातील जवानांना संभ्रमित करत आहे. याच वेळी त्यांनी अग्निवीरांना एक मोठी गॅरंटीही दिली. ते म्हणाले, मी हरियाणातील सर्व अग्निवीरांना गॅरंटी देतो की, ते जेव्हा सैन्यातून परततील, तेव्हा आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ.
अमित शाह यांनी सांगितला काँग्रेस आणि राहुल गांधींचा अजेंडा -
भाजप नेते अमित शाह म्हणाले, काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे, पाकिस्तान सोबत चर्चा करणे आणि दहशतवाद्यांना सोडून देणे. पुन्हा एकदा 370 परत आणण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र ते असे कधीही करू शकणार नाहीत.
पाकव्याप्त काश्मीर आपला आणि भारताचा अविभाज्य भाग -
यावेळी, शाह यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भातही मोठे भाष्य केले. पाकव्याप्त काश्मीर आपला आहे आणि भारताचा अविभाज्य भाग आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हरियाणाची भूमी ही वीरांची भूमी आहे, हरियाणाचे जवान आज देशात सैन्याचा सन्मान वाढवत आहेत, असेही शाह म्हणाले.