महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्या; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 05:48 AM2022-10-15T05:48:56+5:302022-10-15T05:49:34+5:30
राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना पंतप्रधानांना महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे ट्वीट केले.
चित्रदुर्ग : कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा ३७ व्या दिवशी कर्नाटकातील रामपुरा येथून पुन्हा सुरू झाली. भारत जोडो यात्रेदरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी १२ राज्यांचा दौरा करणार असून आतापर्यंत त्यांनी ९५० किमीचा प्रवास केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना पंतप्रधानांना महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे ट्वीट केले आहे. शुक्रवारी ‘भारत जोडो यात्रा’ रामपुरा येथून मार्गस्थ झाली आहे.
सत्ता आल्यास जुनी पेन्शन योजना : प्रियांका
सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आल्यास सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करू, असे आश्वासन देत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा आणि बेरोजगार तरुणांना एक लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी हमी त्यांनी दिली. पाच वर्षांत बेरोजगार तरुणांना पाच लाख नोकऱ्या देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"