ॲन्टाेनी म्हणतात, भाजपातून उभारलेल्या माझ्या मुलाचा पराभव व्हावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 06:35 AM2024-04-10T06:35:23+5:302024-04-10T06:36:02+5:30
ए. के. ॲन्टोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माझा मुुलगा अनिल यांचा पराभव झाला पाहिजे व काँग्रेसचे उमेदवार ॲन्टो ॲन्टोनी हे विजयी होणे आवश्यक आहे
तिरुवअनंतपुरम : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. ॲन्टोनी यांचे पुत्र अनिल के. ॲन्टोनी हे केरळमधील पठाणमथिट्टा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे, अशी इच्छा ए. के. ॲन्टोनी यांनी मंगळवारी व्यक्त केली.
ए. के. ॲन्टोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माझा मुुलगा अनिल यांचा पराभव झाला पाहिजे व काँग्रेसचे उमेदवार ॲन्टो ॲन्टोनी हे विजयी होणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांनी भाजपमध्ये जाणे चुकीचे आहे. ॲन्टोनी यांना त्यांच्या मुलाच्या राजकारणाविषयी पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारले. काँग्रेस पक्ष राष्ट्रीय प्रश्नांवर भूमिका घेत नाही, असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला होता. त्याबद्दल ए. के. ॲन्टोनी म्हणाले की, काँग्रेस पक्ष व त्या पक्षाचे नेते राहुल गांधी सातत्याने रा. स्व. संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांच्या विचारधारेविरुद्ध संघर्ष करत आहे. त्यामुळे कोणीही विजयन यांचे आरोप कोणीही गांभीर्याने घेणार नाही.