"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 03:57 PM2020-08-17T15:57:28+5:302020-08-17T16:00:17+5:30

काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी काँग्रेसच्या 100 नेत्यांनी पक्षातील अंतर्गत परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलं होतं असा दावा केला आहे.

around 100 congress leaders not happy congress including mps says sanjay jha | "काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"

"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी काँग्रेसच्या 100 नेत्यांनी पक्षातील अंतर्गत परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलं होतं असा दावा केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी या संबंधीचं एक ट्वीट केलं आहे. तसेच नेतृत्वासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची मागणी नेत्यांनी केल्याचा दावा देखील संजय झा यांनी केला आहे. पक्ष विरोधी कारवाया व पक्ष शिस्तभंगांची कारवाई करत काही दिवसांपूर्वीच झा यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. 

निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता झा यांना काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसने आपला मार्ग योग्य प्रकारे निवडला नाही तर पक्ष उद्धवस्त होईल असं म्हटलं होतं. तसेच एका लेखामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये विरोधी विचारांबद्दल असहिष्णुता आहे असं म्हटलं आहे. काँग्रेस भाजपावर चुकीच्या पद्धतीने लोकशाही चालवण्याचा आरोप करते. तर दुसरीकडे स्वत:च्या पक्षामध्ये मात्र राजेशाही संस्कृतीला पाठिंबा देते असंही झा यांनी म्हटलं होतं. 

संजय झा यांनी काँग्रेसची परिस्थिती बिघडत असल्याची पाच कारणंही सांगितली. काँग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी ही पारंपारिक पद्धतीने 45 टक्क्यांपर्यंत आहे. सन 1984 मध्ये इंदिरा गांधीच्या हत्येनंतर पक्षाला सर्वाधिक म्हणजेच 48.1 टक्के मतं मिळाली होती. त्यानंतर काँग्रेसला मिळणारी मतं सातत्याने कमी होत आहेत. 1998 मध्ये 25.8 टक्के, 2009 मध्ये 28.5 टक्के आणि 2014 मध्ये 19.52 टक्के मतं काँग्रेसला मिळाल्याचं सांगितलं. 

काँग्रेस सध्या देशातील अनेक मोठ्या राज्यांमधून जवळजवळ गायब झाली आहे यामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, बिहार, गुजरात आणि ओडिशासारख्या मोठ्या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये मागील बऱ्याच काळापासून काँग्रेसला सत्ता स्थापन करता आलेली नाही. पक्षाला तरुणांचा पाठिंबा मिळतानाही दिसत नसल्याचं देखील असंही झा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या लेखामधून पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील 20 वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने केवळ दोन अध्यक्ष निवडले आहेत. 1997 नंतर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची निवडणुक झालेली नाही. 2019 नंतर पक्षाला स्थायी स्वरुपाचा अध्यक्ष नाही असंही झा यांनी लेखात म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

...म्हणून रोहित पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Video - कडक सॅल्यूट! 16 तास पाण्यात अडकलेल्या तरुणाची वायुदलाने अशी केली सुखरुप सुटका

CoronaVirus News : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णांना गाठावं लागतंय रुग्णालय

CoronaVirus News : आपलेही झाले परके! ...अन् मुलांवर आली वडिलांचा मृतदेह सायकलवरून नेण्याची वेळ

संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

Web Title: around 100 congress leaders not happy congress including mps says sanjay jha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.