काँग्रेस महात्मा गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर जातोय; शिवराज सिंह चौहान यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 03:07 PM2021-03-15T15:07:49+5:302021-03-15T15:10:10+5:30
Assam Assembly Election 2021 - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (shivraj singh chauhan) आसाम दौऱ्यावर असून, एका जनसभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
नाहरकटिया : आसाम विधानसभा निवडणुकांचा (Assam Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, भाजपने (BJP) विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (shivraj singh chauhan) आसाम दौऱ्यावर असून, एका जनसभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर चालला आहे, असा दावा चौहान यांनी केला आहे. (assam assembly election 2021 cm shivraj singh chouhan slams congress over various issues)
आसाममधील नाहरकटिया येथे एका जनसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस पक्ष केवळ SRP मध्ये अडकून राहिला आहे. S म्हणजे सोनिया गांधी, R म्हणजे राहुल गांधी आणि P म्हणजे प्रियंका गांधी, या शब्दांत चौहान यांनी निशाणा साधला.
राहुल गांधी अजमल की पार्टी से समझौता क्यों किया, केरल में तुम मुस्लिम लीग से समझौता करते हो, बंगाल में तुम फुरफुरा शरीफ के साथ खड़े हो जाते हो। कांग्रेस को क्या हो गया है? कांग्रेस गांधी के रास्ते पर नहीं चल रही, ये जिन्ना के रास्ते पर चल रही है: शिवराज सिंह चौहान https://t.co/wVqv9RMV0F
— ANI_HindiNews (@AHindinews) March 15, 2021
जिनांच्या मार्गावर काँग्रेसचे मार्गक्रमण
राहुल गांधी यांनी आसाममध्ये अजमल यांच्या पक्षाशी गठबंधन का केले, केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत गेले, तर पश्चिम बंगालमध्ये फुरफुरा शरीफ यांच्या पक्षाला पाठिंबा दिला. काँग्रेसला नेमकं काय झालंय, अशी विचारणा करत, काँग्रेस पक्ष आता महात्मा गांधी यांच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर मार्गक्रमण करतोय, अशी टीका शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी बोलताना केली.
"स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून"; कृषी मंत्र्यांचा टिकैतना टोला
काँग्रेस सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष
केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष आहे. केंद्रातील आणि राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर भारतीय जनता पक्षालाच मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी यावेळी बोलताना केले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून, हेलिकॉप्टरमधील काही तांत्रिक बिघाडामुळे शहांनी एका रॅलीला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केले. यावेळी शहांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका करत लवकरच बंगलामधून गुंडाराज संपेल, असा दावा केला आहे.