'नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील पैसे तुम्ही कुठे लपवले?', राहुल गांधींच्या ट्विटवर CM हिमंता बिस्वा यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 06:31 PM2023-04-08T18:31:50+5:302023-04-08T18:43:48+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक शब्दाचे कोडे ट्विट केले, ज्यामध्ये अदानी व्यतिरिक्त इतर अनेक नावेही अक्षरात लिहिली आहेत.

assam cm himanta biswa sarma counterattack on rahul gandhi after his puzzle word tweet | 'नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील पैसे तुम्ही कुठे लपवले?', राहुल गांधींच्या ट्विटवर CM हिमंता बिस्वा यांचा पलटवार

'नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील पैसे तुम्ही कुठे लपवले?', राहुल गांधींच्या ट्विटवर CM हिमंता बिस्वा यांचा पलटवार

googlenewsNext

गेल्या काही दिवसापासून अदानी समुहाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. त्यांनी शनिवारी एका शब्दाचा एक फोटो ट्विट केला. यावरुन राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांच्यावर अदानी यांच्यावर निशाणा साधला. यावर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे.

गुलाम, शिंदे, हिमंता... अदानी; राहुल गांधींनी पझलमधून ते २०००० कोटी कोणाचे, हे पुन्हा विचारले

राहुल गांधींचे ट्विट रि-ट्विट करत हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रत्यारोप केला. "आम्ही तुम्हाला कधीही विचारले नाही की तुम्ही बोफोर्स आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यांची कमाई कुठे लपवली. आणि तुम्ही किती वेळा ओटावियो क्वात्रोचीला भारतीय म्हटले. " आम्हाला परवानगी दिली. आता आपण कोर्टातच भेटू.", असं मुख्यमंत्री बिस्वा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ओटावियो क्वात्रोची हे इटलीचे प्रसिद्ध उद्योगपती होते. ज्यांच्यावर राजीव गांधी सरकारच्या काळात बोफोर्स घोटाळ्यात दलालीच्या माध्यमातून लाच घेतल्याचा आरोप केला होता. २८ एप्रिल २००९ रोजी सीबीआयने क्वात्रोचीला क्लीन चिट दिली आणि इंटरपोलला त्यांच्यावर जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्याचे आवाहन केले. सीबीआयच्या आवाहनावर इंटरपोलने क्वात्रोचीवरील रेड कॉर्नर हटवला. क्वात्रोची यांना क्लीन चिट देण्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला.  १३ जुलै २०१३ रोजी, वयाच्या ७४ व्या वर्षी, ओटावियो क्वात्रोची यांचे इटलीतील मिलान येथे स्ट्रोकमुळे निधन झाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सकाळी एक शब्दाचे कोडे ट्विट केले, यामध्ये अदानी व्यतिरिक्त इतर अनेक नावेही अक्षरात लिहिली होती. ज्यामध्ये गुलाम नबी आझाद, केंद्रीय सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटोनी यांची नावे दिसत आहेत. यासोबतच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'तो सत्य लपवतो, त्यामुळेच तो दररोज दिशाभूल करतो. प्रश्न एकच आहे - अदानींच्या कंपन्यांमध्ये २०,००० कोटी बेनामी पैसा कोणाचा आहे?', असं ट्विटमध्ये म्हटले आहेत. 

Web Title: assam cm himanta biswa sarma counterattack on rahul gandhi after his puzzle word tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.