"2041 पर्यंत आसाम मुस्लीम राज्य होणार, कुणीही रोखू शकत नाही; राहुल गांधी ॲम्बेसेडर झाले, तर..." - CM सरमा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 05:59 PM2024-07-19T17:59:20+5:302024-07-19T18:01:55+5:30
'आकडेवारीचा विचार करता, आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 40 टक्के आहे आणि 2041 पर्यंत आसाम मुस्लीम बहुसंख्य राज्य होईल. हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुस्लीम लोकसंख्येसंदर्भात मोठा दावा केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सरमा यांनी शुक्रवारी दावा केला की, त्यांच्या राज्यातील मुस्लीम लोकसंख्या दर 10 वर्षांनी सुमारे 30 टक्क्यांपर्यंत वाढत आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, 'आकडेवारीचा विचार करता, आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 40 टक्के आहे आणि 2041 पर्यंत आसाम मुस्लीम बहुसंख्य राज्य होईल. हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही.
राहुल गांधींवर निशाणा -
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, "हिंदू समाजाची लोकसंख्या दर 10 वर्षांनी 16 टक्क्यांपर्यंत वाढत आहे. आपल्या सरकारने मुस्लीम लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाटी पावले उचलली आहेत. उपहासात्मकपणे बोलताना सरमा म्हणाले, 'मुस्लिमांची लोकसंख्या वाढ रोखण्यात काँग्रेस सर्वात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जर राहुल गांधी लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बेसेडर झाले, तर यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. कारण समाज केवळ त्यांचेच ऐकतो."
सरमा यांच्या दाव्यावर विरोधक आक्रमक -
सरमा यांच्या या विधानावर बोलताना आसम कांग्रेसाध्यक्ष भूपेन कुमार व्होरा म्हणाले, मुख्यमंत्री आपले अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारची निधानं करत आहेत. एवढेच नाही, तर विरोधकांनी या आकडेवारीचा स्त्रोत जाणण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. तसेच आसाममध्ये कुठल्याही प्रकारची जनगणना झाली नसल्याचेही म्हटले आहे.