Assembly Election Results 2022: पाच राज्यांचे निकाल काँग्रेसच्या अडचणी वाढवणार; 'जी-२३' पुन्हा बंडाचा झेंडा फडकवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:41 PM2022-03-10T12:41:37+5:302022-03-10T12:42:34+5:30

सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रीया जारी आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात काँग्रेस कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल.

Assembly Election Results 2022: Results of five states will increase the problems of Congress; 'G-23' Leaders Active? | Assembly Election Results 2022: पाच राज्यांचे निकाल काँग्रेसच्या अडचणी वाढवणार; 'जी-२३' पुन्हा बंडाचा झेंडा फडकवणार?

Assembly Election Results 2022: पाच राज्यांचे निकाल काँग्रेसच्या अडचणी वाढवणार; 'जी-२३' पुन्हा बंडाचा झेंडा फडकवणार?

googlenewsNext

नोएडा – जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी, नवीन पटनायकसारख्या नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडले गेले ते म्हणजे अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal). आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) सुपडा साफ केला आहे. आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांनी काँग्रेसचा पराभव केला. ममता बॅनर्जींनीही काँग्रेसपासून फारकत घेतल्यानं पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस साफ झाली. ओडिशामध्ये नवीन पटनायक यांचा एकहाती कारभार सुरू आहे. आता पंजाबही सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या हातातून निसटलं आहे.

विशेष म्हणजे या सर्व राज्यात भाजपा काँग्रेसला(Congress) एक पाऊल मागे अथवा तिसऱ्या नंबरवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. काही राज्यात त्याला यश आलं. मणिपूर इथंही तेच झाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानं भाजपाच्या काँग्रेसमुक्त भारत अभियानात इतर सहकारीही जोडले गेले. त्यामुळे अंतरिम अध्यक्षाच्या बळावर सुरू असलेल्या सर्वात जुन्या पार्टीतील २३ नाराज नेते पुन्हा एकदा गांधी कुटुंबाविरोधात प्रहार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोनिया गांधी यांच्या रणनीतीनं ५ राज्यांच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमधील वाद शमवण्यात यश आले. काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते पक्षाच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे करताना दिसून आले.

सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रीया जारी आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात काँग्रेस कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. यावेळी सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वत:कडे ठेवतील का दुसऱ्या कुणाकडे देतील हे सांगणं कठीण आहे. आता गांधी कुटुंबात प्रियंका गांधी एकमेव नेता आहे ज्यांच्यावर जी-२३ सहमत होऊ शकतं. राहुल गांधींच्या निर्णय क्षमतेवर याआधी प्रश्न उभे झाले आहेत. अनेक नेते राहुल गांधींच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत आहेत. पंजाबमध्ये प्रचाराला सुरुवात केल्यानंतर राहुल गांधी अचानक परदेशी निघून गेले होते. उत्तर प्रदेशात २०० पेक्षा जास्त रॅली घेऊन प्रियंका गांधींनी योगी आदित्यनाथ यांनाही मागे टाकलं. यूपीत भलेही काँग्रेसला यश मिळालं नाही. परंतु प्रियंका गांधी काँग्रेसला जुनी ओळख देण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रियंका गांधी यांची इंदिरा गांधी यांची तुलना होते. त्यामुळे काँग्रेसमधील नाराज गट प्रियंका गांधींना पुढे ठेवू शकतो. आगामी काळात काँग्रेसला मजबूत आणि पक्षाला कार्यक्रम देण्याच्या दृष्टीने प्रियंका गांधी कामकाज करू शकतात. परंतु हे इतकं सोपं नाही. काँग्रेसला जुने आणि नवीन नेते यांच्यात समन्वय साधणं हे मोठं आव्हानात्मक आहे. कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल सारखे नेते आणि जी-२३ यातील अनुभवी नेते यांच्यात ताळमेळ ठेवणे यावर काँग्रेसचं भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: Assembly Election Results 2022: Results of five states will increase the problems of Congress; 'G-23' Leaders Active?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.