Assembly Elections 2023: कर्नाटक विजयानंतर या राज्यांवर काँग्रेसची नजर, नवीन रणनिती आखण्यास सुरुवात...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 08:58 PM2023-05-21T20:58:25+5:302023-05-21T20:58:56+5:30
Assembly Elections 2023: या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसने या वर्षी होणाऱ्या अन्य विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस अध्यक्षांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणातील वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यापैकी दोन राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी नवीन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशातील बंडखोरीतून धडा घेत काँग्रेस यावेळी पुन्हा विजयासाठी प्रयत्नशील आहे.
कर्नाटकात सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे संपूर्ण लक्ष आता निवडणूक असलेल्या राज्यांवर आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे गेल्या एक महिन्यापासून कर्नाटकातील त्यांच्या गृहराज्यातील निवडणुकांमध्ये व्यस्त होते आणि निवडणुकीची पूर्ण जबाबदारी त्यांच्या हाती होती. या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत पक्षाच्या सूत्रांचे मत आहे की, भूपेश बघेल यांचे सरकार छत्तीसगडमध्ये चांगले काम करत आहे. त्यांच्या विरोधात वातावरण नाही, त्यामुळे तिथे काँग्रेसची पुनरावृत्ती होऊ शकते.
दुसरीकडे, मध्य प्रदेशात भाजपसाठी अडचणी कमी नाहीत. येथील वातावरण शिवराज सिंह यांच्या विरोधात आहे. याचाच फायदा घेत काँग्रेस तळागळात काम करण्यात मग्न आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे दोन्ही बडे नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह उत्तम समन्वयाने काम करत आहेत. राजस्थानमध्येही अशोक गेहलोत सरकारच्या योजना राज्यात चांगल्यारितीने राबविल्या जात असल्याबद्दल काँग्रेसला आशा आहे. पण, गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद मिटवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकात पक्षाच्या विजयाचा परिणाम दक्षिणेकडील तेलंगणात राज्यातही दिसून येऊ शकतात. तेलंगणाचे नेतृत्व रेवंत रेड्डी हे ज्वलंत नेते करत असून ते तरुणांमध्येही खूप लोकप्रिय आहेत. तेलंगणातील केसीआर सरकारच्या विरोधात त्यांनी अनेक मोठ्या जाहीर सभा केल्या आहेत. अशारितीने काँग्रेस येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर बारकीईने लक्ष ठेवून आहे.