काँग्रेसकडून तो फतवा मागे....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 05:45 PM2018-09-08T17:45:48+5:302018-09-08T17:46:27+5:30
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीवरून इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. यामुळे काँग्रेसने या आठवड्यात फेसबुकवर 15 हजार लाईक असलेले पेज, ट्विटरवर 5 हजार फॉलोअर्स असतील तरच निवडणुकीचे तिकिट मिऴणार असल्याचा फतवा काढण्यात आला होता. तो आज माघारी घेण्यात आला.
मध्य प्रदेशकाँग्रेस कमिटीच्या वतीने हा फतवा काढण्यात आला होता. यामध्ये बूथ लेव्हलवरही कार्यकर्त्यांचा व्हाट्सअॅप ग्रुप हवा अशी अट घालण्यात आली होती. यामुळे काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये खळबळ माजली होती.
Madhya Pradesh Congress Committee (MPCC) has withdrawn its letter to ticket aspirants, in which it was mentioned that 'candidates in upcoming polls must have 15,000 likes on their FB page, 5000 Twitter followers, & WhatsApp group of booth-level workers." pic.twitter.com/bKfE4uCFbt
— ANI (@ANI) September 8, 2018
काँग्रेसचे मध्यप्रदेशमधील उपाध्यक्ष चंद्रप्रभाष शेखर यांनी 2 सप्टेंबरला हा आदेश जारी केला होता. आज त्यांनी पुन्हा काँग्रेस कमिटीच्या लेटरहेडवर हा आदेश मागे घेत असल्याचे कळविले आहे.