"2 वर्षांत काय बदललं?"; भारत जोडो न्याय यात्रेत पहिल्यांदाच दिसल्या प्रियंका गांधी, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 02:17 PM2024-02-24T14:17:13+5:302024-02-24T14:17:46+5:30
Congress Rahul Gandhi And Priyanka Gandhi : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचं मुरादाबादच्या रस्त्यावर लोकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये सुरू आहे. या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधीही दिसल्या. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचं मुरादाबादच्या रस्त्यावर लोकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
भारत जोडो न्याय यात्रा मुरादाबादहून अमरोहा, संभल, बुलंदशहर, अलीगड, हाथरस, आग्रा मार्गे निघेल, ज्यामध्ये प्रियंका गांधी फतेहपूर सिकरीपर्यंत राहुल गांधींसोबत असतील. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या मुरादाबाद दौऱ्यावर सपा कार्यकर्त्यांनीही त्यांचं स्वागत केलं.
मुरादाबादच्या दौऱ्यात सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे पोस्टरही पाहायला मिळाले. राहुल गांधींची यात्रा रविवारी आग्रा येथे पोहोचेल, तेथे सपा प्रमुख अखिलेश यादव 25 फेब्रुवारीला भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होतील.भारत जोडो यात्रेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, मुरादाबादमध्ये आल्याचा आनंद आहे.
राहुल गांधी जी 'भारत जोड़ो न्याय यात्रा' कर रहे हैं।
— Congress (@INCIndia) February 24, 2024
इस यात्रा में 'न्याय' शब्द इसलिए जुड़ा है, क्योंकि देश की महिलाओं, युवाओं, किसानों के साथ अन्याय हो रहा है।
जब तक आप बदलाव नहीं लाएंगे, तब तक आपकी परिस्थितियां बदलने वाली नहीं हैं।
: @priyankagandhi जी
📍 उत्तर प्रदेश pic.twitter.com/uzvjZH4mNP
प्रियंका यांनी लोकांना प्रश्न विचारत म्हटलं की, दोन वर्षांत इथे काय बदललं?. समस्या सुटल्या की नाही? आज पेपर लीक झाले आहेत, तरुण बेरोजगार आहेत.यासोबतच प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की, सरकार सातत्याने अत्याचार करत असून बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र त्यांचं कोणीही ऐकत नाही.
गोरगरिबांच्या घरावर बुलडोझर चालला असून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यूपीमधील मुरादाबाद येथून या यात्रेत सामील झाल्या आहेत, त्या चंदौली येथूनच या यात्रेत सहभागी होणार होत्या, परंतु प्रकृती बरी नसल्यामुळे त्या तेव्हा सहभागी होऊ शकल्या नाहीत.