सरकारी नोकरी ते व्यावसायिक कर्ज...देशातील तरुणांसाठी राहुल गांधीची 5 आश्वासने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 04:33 PM2024-03-07T16:33:05+5:302024-03-07T16:33:51+5:30
Bharat jodo Nyay Yatra: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी देशातील तरुणांसाठी मोठ्या घोषणा केली.
Lok Sabha Election 2024: निवडणूक जवळ आल्यावर राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने दिली जातात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान देशातील तरुणांना उद्देशून मोठ्या घोषणा केल्या आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गुरुवारी (7 मार्च 2024) राहुल गांधींच्या पाच आश्वासनांची यादी सोशल मीडियावर शेअर केली.
राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पहिले पाऊल म्हणजे, भारतात 30 लाख सरकारी जागा रिक्त आहेत. पीएम मोदी त्या जागा भरुन काढणार नाहीत. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही त्या 30 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे काम करू.
ते पुढे म्हणाले की, दुसरी गोष्ट म्हणजे मनरेगाचे अधिकार आम्ही दिले होते. त्याचप्रमाणे आम्ही भारतातील सर्व तरुणांना शिकाऊ अप्रेंटिसशिपचा अधिकार देणार आहोत. प्रत्येक पदवीधर तरुणाला हा अधिकार मिळेल. कॉलेज डिप्लोमानंतर प्रत्येक पदवीधराला सरकारी कार्यालय आणि खासगी कंपनीत एक वर्षाची अप्रेंटिसशिप आणि त्यासोबत एक लाख रुपये दिले जातील. कॉलेज पूर्ण केल्यानंतर तात्काळ हा हक्क मनरेगाच्या हक्कासारखा मिळेल.
आज राजस्थान के बांसवाड़ा में आयोजित भारत जोड़ो न्याय यात्रा की जनसभा में खड़गे जी और राहुल गांधी ने युवा न्याय के लिए पाँच बड़ी गारंटी दी:
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) March 7, 2024
1. भर्ती भरोसा: कांग्रेस पार्टी केंद्र सरकार में 30 लाख नौकरी की गारंटी देती है। हम एक कैलेंडर जारी करेंगे और उसके अनुसार समयबद्ध तरीक़े से…
काँग्रेसची आश्वासने...
1. भरतीचे आश्वासन: सत्ता आल्यानंतर काँग्रेस पक्ष केंद्रात 30 लाख नोकऱ्या देणार. आम्ही एक कॅलेंडर जारी करू आणि त्यानुसार भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करू.
2. पहिली नोकरी पक्की: प्रत्येक डिप्लोमा किंवा पदवीधरांना सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील कंपनीत एक वर्ष अप्रेंटसशिप दिली जाईल. यासोबतच, 1 लाख रुपये (₹8,500/महिना) मिळेल.
3. पेपर लीकपासून स्वातंत्र्य: सार्वजनिक परीक्षांमध्ये पेपर लीक टाळण्यासाठी आणि निष्पक्ष परीक्षा घेण्यासाठी नवीन कायदा केला जाईल. याद्वारे कोट्यवधी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून रोखले जाईल.
4. गिग इकॉनॉमीमधील सामाजिक सुरक्षा: काँग्रेस गिग इकॉनॉमीमध्ये दरवर्षी रोजगार शोधणाऱ्या लाखो तरुणांसाठी चांगल्या कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कायदा आणला जाईल.
5. युवा रोशनी: काँग्रेस पाच वर्षांच्या कालावधीसाठी देशातील सर्व जिल्ह्यांसाठी 5,000 कोटी रुपयांचा निधी तयार करेल. 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण कोणत्याही क्षेत्रातील त्यांच्या स्टार्ट-अपसाठी हा निधी मिळवण्यास पात्र असतील.