महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांतून जाईल ‘भारत जोडो न्याय यात्रा’; २० मार्च रोजी मुंबईत होणार समारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 08:22 AM2024-01-05T08:22:31+5:302024-01-05T08:22:59+5:30
मणिपूरमधून सुरू होणारी ही यात्रा महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधून ४८० किमीचा प्रवास करून मुंबईत २० मार्च रोजी समारोप होणार असल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी दिली.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या १४ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची रूपरेषा आज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली. मणिपूरमधून सुरू होणारी ही यात्रा महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधून ४८० किमीचा प्रवास करून मुंबईत २० मार्च रोजी समारोप होणार असल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी दिली.
ही यात्रा लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात पोहोचण्याची अपेक्षा आहे. तरीही २० मार्चपूर्वी शेवटच्या पाच दिवसांत महाराष्ट्रातील ४७९ किमीचे अंतर पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
या राज्यांतून होईल प्रवास -
मणिपूर - १०७ किमी (४ जिल्हे)
नागालँड - २५७ किमी (५ जिल्हे)
आसाम - ८३३ किमी (१७ जिल्हे)
अरुणाचल प्रदेश - ५५ किमी (१ जिल्हा)
मेघालय - ५ किमी (१ जिल्हा)
पश्चिम बंगाल - ५२३ किमी (७ जिल्हे)
बिहार - ४२५ किमी (७ जिल्हे)
झारखंड ८०४ किमी (१३ जिल्हे)
ओडिशा ३४१ किमी (४ जिल्हे)
छत्तीसगड ५३६ किमी (७ जिल्हे)
उत्तर प्रदेश १,०७४ किमी (२० जिल्हे)
मध्य प्रदेश ६९८ किमी (९ जिल्हे)
राजस्थान १२८ किमी (२ जिल्हे)
गुजरात ४४५ किमी (७ जिल्हे)
महाराष्ट्र ४८० किमी (६ जिल्हे)