Bharat Jodo Yatra: "भाजपाशासित राज्यात भारत जोडो यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न", काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 02:21 PM2022-11-16T14:21:32+5:302022-11-16T14:23:05+5:30

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेमध्ये भाजपाशासित राज्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न करण्यात आले,असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी केला.

Bharat Jodo Yatra: Congress leader Jairam Ramesh's serious allegation of "attempting to obstruct Bharat Jodo Yatra in BJP-ruled state" | Bharat Jodo Yatra: "भाजपाशासित राज्यात भारत जोडो यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न", काँग्रेसचा गंभीर आरोप

Bharat Jodo Yatra: "भाजपाशासित राज्यात भारत जोडो यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न", काँग्रेसचा गंभीर आरोप

Next

वाशिम - भारत जोडो यात्रेमध्ये भाजपाशासित राज्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणातही असे प्रयत्न झाले. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्क अडथळे निर्माण केले जात आहेत असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी केला.

जयराम रमेश यांनी यावेळी मनरेगाच्या संदर्भात माहिती दिली. ही योजना अत्यंत महत्वपूर्ण असून युपीए सरकारने ती लागू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यावरही टीका करण्यात आली होती, पैसा कोठून येणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची खिल्ली उडवली होती पण आजही तीच योजना रोजगार देण्यास आधार ठरली आहे. अन्न सुरक्षा योजनेलाही नरेंद्र मोदी यांनी विरोध केला होता आता तीच योजना जनतेला धान्य पुरवण्यास उपयोगी ठरली आहे. मनरेगा ही महाराष्ट्रातील दृष्टे नेते वी. स. पागे यांच्या संकल्पनेतून बनलेल्या रोजगार हमी योजनेवर बेतलेली आहे, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

विदर्भ, मराठवाड्यातील रस्ते खराब.. 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका करत जयराम रमेश म्हणले की, देशभरात दररोज शेकडो किलोमीटरचे रस्ते बांधतो, अशी वल्गणा करणाऱ्या गडकरींना विदर्भ, मराठवाड्यातील रस्ते बांधणी करता आले नाहीत. या भागातील रस्ते अत्यंत खराब आहेत, असे जयराम रमेश म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे महाराष्ट्राचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यम विभागाच्या महिमा सिंह उपस्थित होत्या.

Web Title: Bharat Jodo Yatra: Congress leader Jairam Ramesh's serious allegation of "attempting to obstruct Bharat Jodo Yatra in BJP-ruled state"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.