"आपकी नफरत को हमारा प्यार काटेगा!" भारत जोडो यात्रेची दिल्लीत एंट्री; भाजपनं खडा केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 09:29 AM2022-12-24T09:29:25+5:302022-12-24T09:30:36+5:30

राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले, आज आपण सर्वजण भारताची राजधानी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर उभे आहोत. या या यात्रेसाठी आणि देशासाठीही एक ऐतिहासिक क्षण आहे.

Bharat Jodo Yatra entering into Delhi rahul gandhi says Our love will cut your hatred BJP raised the question | "आपकी नफरत को हमारा प्यार काटेगा!" भारत जोडो यात्रेची दिल्लीत एंट्री; भाजपनं खडा केला सवाल

"आपकी नफरत को हमारा प्यार काटेगा!" भारत जोडो यात्रेची दिल्लीत एंट्री; भाजपनं खडा केला सवाल

googlenewsNext

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाता सुरू असलेली भारत जोडो यात्रा शनिवारी राजधानी दिल्लीत दाखल झाली आहे. या यात्रेने आज सकाळी बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केला आहे. ती सकाळी साडेदहा वाजता जयदेव आश्रम, आश्रम चौकाजवळ पोहोचेल. यानंतर ही यात्रा दुपारी 4.30 वाजता लाल किल्ल्यावर जाईल. यात्रेच्या दिल्लीत आगमनावरूनही राजकारण सुरू झाले आहे. 'पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे, मात्र काँग्रेस केंद्राने जारी केलेल्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत नाही,' असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले, आज आपण सर्वजण भारताची राजधानी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर उभे आहोत. या या यात्रेसाठी आणि देशासाठीही एक ऐतिहासिक क्षण आहे. या संपूर्ण यात्रेदरम्यान आपण लोकांकडून खूप काही शिकलो. आम्ही त्यांच्या वेदना अनुभवल्या आणि त्यांच्या इच्छा ऐकल्या. याच बरोबर, आता भारत जोडो यात्रा हा प्रेमाचा आवाज आणि भारतातील लोकांचा संदेश दिल्लीपर्यंत घेऊन जाईल. एवढेच नाही, तर आपण माझे शब्द लिहून ठेवा, 'आपल्या द्वेषावर आमच्या प्रेमाचा विजय होईल,' असेही राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधी म्हणाले, आम्ही 3000 किमीचा प्रवास पूर्ण केला आहे आणि अजूनही चालत आहोत. लोकांना वाटते की हे कसे शक्य आहे? तर समजून जा, की ही लोकांची ताकद आहे, जी या यात्रेमागे उभी आहे. आम्ही ज्या-ज्या ठिकाणी यात्रा केली, तेथे तेथे मला एकच गोष्ट दिसली, ती म्हणजे प्रेम. याच वेळी आम्ही, महागाई हटवा, बेरोजगारी संपवा, द्वेष पसरवू नका, असेही म्हटले आहे. भारताचा हाच आवाज घेऊन आम्ही 'राजा'च्या सिंहासनापर्यत दिल्लीत घेऊन आलो आहोत.

बीजेपने साधला निशाणा - 
माध्यमांतील वृत्तांनुसार, अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे, की जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी योग्य पावले उचलली आहेत, मग काँग्रेस त्याला विरोध का करत आहे? कोरोना प्रोटोकॉल सर्वांसाठीच आहेत. 

Web Title: Bharat Jodo Yatra entering into Delhi rahul gandhi says Our love will cut your hatred BJP raised the question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.