Bharat Jodo Yatra : भारताचे माजी लष्करप्रमुख भारत जोडो यात्रेत; भाजपची टीका तर काँग्रेसचे प्रत्युत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 04:09 PM2023-01-09T16:09:07+5:302023-01-09T16:15:58+5:30
Bharat Jodo Yatra: सैन्यातील शूर जवानांचा अपमान केल्याचा आरोपही काँग्रेसने भाजपवर केला.
Bharat Jodo Yatra: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे भाजपने प्रश्न उपस्थित केला. त्यावर काँग्रेसनं सोमवारी (9 जानेवारी) भाजपवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं भाजपवर लष्करातील शूर जवानांची बदनामी केल्याचा आरोपही केला. जनरल (निवृत्त) कपूर आणि संरक्षण सेवेतील अनेक निवृत्त उच्च अधिकारी रविवारी (8 जानेवारी) राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा सध्या हरियाणातून जात आहे.
हरियाणा दौऱ्यावर राहुल गांधींसोबत जनरल कपूर यांचा फोटो ट्विट करत भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी लिहिले, "माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर राहुल गांधींच्या भारत जोडो दौऱ्यात सामील झाले. कपूर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आदर्श घोटाळ्याचा आरोप होता. सशस्त्र दलांना लाज वाटेल यासाठी या अधिकाऱ्यांना कोणतेही सरकारी पद धारण करण्यास बंदी घालता येऊ शकते, असेही चौकशी समितीचे मत होते," असं मालविय म्हणाले.
Ex-COAS Gen Deepak Kapoor, Lt Gen RK Hooda, Lt Gen VK Narula, AM PS Bhangu, Maj Gen Satbir Singh Chaudhary, Maj Gen Dharmender Singh, Col Jitender Gill, Col Pushpender Singh, Lt Gen DDS Sandhu, Maj Gen Bishamber Dayal, Col Rohit Chaudhry join @RahulGandhi at the #BharatJodoYatrapic.twitter.com/giKo7DuKd6
— Congress (@INCIndia) January 8, 2023
काँग्रेसने प्रत्युत्तर दिले
मालवीय यांच्यावर निशाणा साधत काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या, "जनरल कपूर, 1971 च्या भारत-पाक युद्धातील एक दिग्गज, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम आणि सेना पदक यासह इतर पुरस्कार प्राप्त अधिकारी आहेत. त्यांनी 1967 ते 2010 या काळात सेवा बजावली. चार दशकांहून अधिक काळ आपल्या देशाची सेवा केली. आमच्या शूर जवानांची बदनामी केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे."
वीरों के कदमताल के साथ आगे बढ़ी #BharatJodoYatra
— Congress (@INCIndia) January 8, 2023
देश की रक्षा में दुश्मनों को धूल चटानी हो या नफ़रत को हराकर देश जोड़ना हो...मकसद अगर देशहित में हो तो वीर पीछे नहीं हटते।
आपके जज़्बे को सलाम। pic.twitter.com/xrNmoGHaGD
जयराम रमेश आणि पवन खेडा यांनीही ट्विट केले
सुप्रिया श्रीनाते यांच्या ट्विटला टॅग करत, काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी सोमवारी ट्विट केले, "अशा आजारी आणि भ्रष्ट मनाकडून तुम्हाला खरोखर काही चांगल्याची अपेक्षा आहे का?" मालवीय यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले, "जेव्हा त्यांनी जनरल दीपक कपूर आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर 2017 मध्ये गुजरातमध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी ISI सोबत कट रचल्याचा आरोप केला, तेव्हाच त्यांचे बॉस वेगळ्या पातळीवर गेले होते. यासाठी जेटलींना सभागृहातील न्यायालयाची माफी मागावी लागली होती.''
माजी अधिकाऱ्यांचा यात्रेत सहभाग
दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर, निवृत्त लेफ्टनंट जनरल आरके हुडा, निवृत्त लेफ्टनंट जनरल व्हीके नरुला, निवृत्त एअर मार्शल पीएस भांगू, सेवानिवृत्त मेजर जनरल सतबीर सिंग चौधरी, सेवानिवृत्त मेजर जनरल धर्मेंद्र सिंह, निवृत्त लेफ्टनंट जनरल व्ही.के., जितेंद्र गिल, सेवानिवृत्त कर्नल पुष्पेंद्र सिंग, सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल डीडीएस संधू, निवृत्त मेजर जनरल बिशंबर दयाल आणि सेवानिवृत्त कर्नल रोहित चौधरी सहभागी झाले होते.