Bharat Jodo Yatra: तेलंगणात पोहोचली 'भारत जोडो यात्रा', राहुल गांधींनी स्वतःला मारुन घेतले चाबकाचे फटके...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 05:48 PM2022-11-03T17:48:30+5:302022-11-03T17:51:04+5:30
Bharat Jodo Yatra: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणात असून, पुढचा मुक्काम महाराष्ट्रात असणार आहे.
Bharat Jodo Yatra: गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी पक्षाच्या 'भारत जोडो' यात्रेवर आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता यात्रेचा नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी तेलंगणातील पारंपारिक बोनालू उत्सवात भाग घेतल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, यादरम्यान राहुल गांधींनी प्रथेनुसार, स्वतःलाही चाबकांनी मारुन घेतले.
स्वतःवर चाबकाचे फटके मारले
అన్ని సాంప్రదాయాలు తనవిగా ముందుకు కదులుతున్న భారతావని ముద్దుబిడ్డ రాహుల్ గాంధీ..#BharatJodoYatra#ManaTelanganaManaRahulpic.twitter.com/RSP0lV3sKG
— Telangana Congress (@INCTelangana) November 3, 2022
भारत जोडो यात्रेचा गुरुवारी 57वा दिवस होता. यामध्ये राहुल गांधी बोनालू महोत्सवात सहभागी झाले. यावेळी राहुल पोथराजूच्या(पोतराज) अवतारात दिसले. विशेष म्हणजे, राहुल यांनी पोतराजाप्रमाणे स्वतःवर चाबकांचे फटकेही मारले. पोथराजू किंवा पोतरात हा बोनालू उत्सवाचा प्रमुख भाग आहे. पोतराजाला देवी महाकालीचा भाऊ मानले जातो. हा देवीच्या रक्षणासाठी हातात चाबूक घेऊन चालतो, अशी मान्यता आहे.
भारत जोडो यात्रा कुठे पोहोचली?
Our tribals are the repositories of our timeless cultures & diversity.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 29, 2022
Enjoyed matching steps with the Kommu Koya tribal dancers. Their art expresses their values, which we must learn from and preserve. pic.twitter.com/CT9AykvyEY
काँग्रेसची भारत जोडी यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. हा प्रवास या राज्यातील 19 विधानसभा आणि 7 लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. यादरम्यान राहुल गांधी एकूण 375 किलोमीटरचा प्रवास करतील. राहुल यांनी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात केली होती. ही यात्रा काश्मीरमध्ये संपणार आहे. हा संपूर्ण प्रवास 3570 किलोमीटरचा आहे. तेलंगणानंतर आता या प्रवासाचा पुढचा मुक्काम महाराष्ट्र असणार आहे.