जेव्हा राहुल गांधींना राग येतो; सेल्फे घेणाऱ्या काँग्रेस नेत्याचा हात झटकला, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 02:52 PM2022-12-21T14:52:23+5:302022-12-21T14:54:13+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' बुधवारी सकाळी राजस्थानमधून हरियाणात दाखल झाली.

bharat jodo yatra; Rahul Gandhi gets angry; took of phone while congress worker taking photo | जेव्हा राहुल गांधींना राग येतो; सेल्फे घेणाऱ्या काँग्रेस नेत्याचा हात झटकला, पाहा Video...

जेव्हा राहुल गांधींना राग येतो; सेल्फे घेणाऱ्या काँग्रेस नेत्याचा हात झटकला, पाहा Video...

Next

Bharat Jodo Yatra:काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुधवारी सकाळी राजस्थानमधून हरियाणात दाखल झाली. यावेळी फ्लॅग एक्सचेंज सोहळ्यात राहुल गांधी संतापले. राहुलचा राग पाहून सहकारी नेतेही आश्चर्यचकित झाले होते. कार्यक्रमादरम्यान स्टेजवर एक नेता सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र राहुल गांधींनी रागाने हात झटकला आणि फोन काढून घेतला. राहुल का संतापले, हे समजू शकले नाही.

सहकारी नेत्यांचे कौतुक
यावेळी राहुल गांधींनी आपल्या सहकारी नेत्यांचे कौतुक केले. राहुल म्हणाले, 'मला आनंद आहे की, राजस्थानचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, सर्व मंत्री आणि नेत्यांनी महिन्यातून किमान एकदा 15 किलोमीटर चालण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचे म्हणणे ऐकून ते काम करणार आहेत. मी खर्गेजींना सांगेल की, जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे, तिथे आपल्या मंत्र्यांना-नेत्यांना महिन्यातून किमान एक दिवस या रस्त्यांवर चालून जनतेच्या समस्या सोडवण्यास सांगावे.

भाजपवर बोचरी टीका
राहुल पुढे म्हणाले की, या प्रवासात खूप काही शिकायला मिळत आहे. प्रवासात आपण लांबलचक भाषणे देत नाही. सहा वाजता प्रवास सुरू होतो, आम्ही सहा ते सात तास चालतो आणि नंतर 15 मिनिटांचे भाषण देतो. आजकाल नेता आणि जनता यांच्यात दरी निर्माण झाली आहे. जनतेचे ऐकण्याची गरज नाही, असे नेत्यांना वाटते. तासन्तास लांबलचक भाषणे देतात. आम्ही फक्त बोलत नाही, तर जनतेचे म्हणणे ऐकतो. 

मालखेडा सभेच्या चर्चेचा पुनरुच्चार करत राहुल म्हणाले की, भाजप नेत्यांनी विचारले की यात्रेची गरज काय? तर आम्ही द्वेषाच्या जगात प्रेम पसरवत आहोत. जेव्हा जेव्हा हे लोक या देशात द्वेष पसरवायला जातात तेव्हा आपल्या विचारसरणीचे लोक प्रेम पसरवायला लागतात. हा लढा नवीन नाही, हा लढा हजारो वर्षे जुना आहे. यामध्ये दोन विचारधारा कार्यरत आहेत. एक विचारधारा जी निवडकपणे लोकांना फायदेशीर ठरते आणि दुसरी विचारधारा म्हणजे लोकांचा आवाज. तो शेतकरी, मजुराचा आवाज आहे, त्याची विचारधारा आहे., अशी टीकाही राहुल यांनी केली.

Web Title: bharat jodo yatra; Rahul Gandhi gets angry; took of phone while congress worker taking photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.