आरएसएस-भाजपचे लोक माझे गुरू, देतायत चांगले ट्रेनिंग; राहुल गांधींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 01:30 PM2022-12-31T13:30:47+5:302022-12-31T13:32:57+5:30
राहुल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल म्हणाले, ''जेव्हा मी भारत जोडो यात्रा सुरू केली, तेव्हा मी तिच्याकडे कन्याकुमारी ते काश्मीर अशी एक सामान्य यात्रा म्हणून पाहत होतो. पण...
राहुल गांधी यांनी, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत निघालेली आपली भारत जोडो यात्रा अत्यंत यशस्वी असल्याचे म्हटले आहे. याच बरोबर त्यांनी आरएसएस आणि भाजपचेही उपहासात्मक पद्धतीने आभार मानले आहेत. राहुल गांधी म्हणाले, मी भाजप आणि आरएसएसच्या लोकांचे आभार मानू इच्छितो, कारण ते आम्हाला जेवढे लक्ष्य करतात, तेवढेच ते आम्हाला कोणत्याना कोणत्या पद्धतीने मदतच करतात.
राहुल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल म्हणाले, ''जेव्हा मी भारत जोडो यात्रा सुरू केली, तेव्हा मी तिच्याकडे कन्याकुमारी ते काश्मीर अशी एक सामान्य यात्रा म्हणून पाहत होतो. मात्र, या यात्रेत एक आवाज आणि भावना आहेत, असे हळू हळू आमच्या लक्षात आले.
राहुल गांधी म्हणाले, ''मी विशेषतः आरएसएस आणि भाजपच्या लोकांचे आभार मानतो. कारण ते जेवढे आक्रमण करतात, आम्हाला तेवढीच सुधारण्याची संधी मिळते. माझी इच्छा आहे, की त्यांनी त्यांच्या आक्रमानाची तीव्रता अणखी वाढवावी. यामुळे काँग्रेसला आपली विचारधारा अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. मी त्यांना (आरएसएस आणि भाजपला) आपला गुरु मानता. काय करायला हवे आणि काय नको, यासंदर्भात ते मला मार्ग दाखवतात. ते आम्हाला चांगली ट्रेनिंग देत आहेत."