काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबरपासून सुरु होणार?; यंदा असणार खास रणनिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 02:25 PM2023-11-07T14:25:25+5:302023-11-07T14:28:21+5:30

Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. 

Bharat Jodo Yatra: Second leg of Congress' Bharat Jodo Yatra to start from December?; This year there will be a special strategy! | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबरपासून सुरु होणार?; यंदा असणार खास रणनिती!

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबरपासून सुरु होणार?; यंदा असणार खास रणनिती!

नवी दिल्ली: 'भारत जोडो यात्रे'च्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नवी प्रतिमा देशासमोर उभी राहिली आहे, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. यामुळे 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. 

काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करत आहे. यंदा हा प्रवास पूर्वीसारखा पायी होणार नसून तो हायब्रीड करण्याची तयारी सुरू आहे. यापूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून यात्रा सुरू केली होती, जी ३० जानेवारी २०२३ रोजी काश्मीरमध्ये संपली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेच्या तयारीत आहे. मात्र, हा प्रवास हायब्रीडप्रमाणे केला जाईल, म्हणजे कुठे पायी तर कुठे वाहनातून काँग्रेसची भारत जोडो यात्रा पार पडेल. ही भारत जोडो यात्रा या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू होऊ शकते, जी पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील.

भारत जोडो यात्रा संपल्यानंतर राहुल गांधींनी अनेकवेळा आपले अनुभव शेअर केले होते, ज्यात त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या गुडघ्यात दुखत होते, त्यामुळे चालणे खूप कठीण झाले. मात्र जनतेकडून मिळालेल्या प्रेमामुळे त्यांनी दुःख विसरून हा प्रवास पूर्ण केला. कदाचित त्यामुळेच राहुल गांधी आणि इतर नेत्यांना अडचणी येऊ नयेत, म्हणून काँग्रेसने यात्रेचा दुसरा टप्पा हायब्रीड म्हणून निवडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Web Title: Bharat Jodo Yatra: Second leg of Congress' Bharat Jodo Yatra to start from December?; This year there will be a special strategy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.