Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना आईची साथ; सोनिया गांधी 'भारत जोडो' यात्रेत सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 07:00 PM2022-10-03T19:00:36+5:302022-10-03T19:00:36+5:30

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांनी 1 ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील चामुंडी डोंगरावरील चामुंडेश्वरी मंदिरात प्रार्थना केली.

Bharat Jodo Yatra: Sonia Gandhi joins rahul gandhi in Congress's 'Bharat Jodo' Yatra | Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना आईची साथ; सोनिया गांधी 'भारत जोडो' यात्रेत सामील

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना आईची साथ; सोनिया गांधी 'भारत जोडो' यात्रेत सामील

googlenewsNext

Congress Bharat Jodo Yatra:राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेची (Congress Bharat Jodo Yatra) सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या यात्रेत पक्षाचे अनेक नेते जोडले जात आहेत. आता पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीही या यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेत सहभागी होण्यासाठी सोनिया गांधी (Sonia Gandhi) सोमवारी (3 ऑक्टोबर) म्हैसूरला पोहोचल्या आहेत.

सोनिया गांधी यात्रेत सामील होणार
सोनिया गांधी 6 ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील मंड्या येथे भारत जोडो यात्रेत सामील होतील. प्रदीर्घ काळानंतर सोनिया गांधी पक्षाच्या  जाहीर कार्यक्रमात सहभागी होत आहेत. प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांना गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रचारही करता आला नव्हता. राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात केली. या 150 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासात 3,500 किमीचे अंतर कापले जाणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेचा समारोप होईल.

कर्नाटकात तिसऱ्या दिवसाचा प्रवास सुरूच 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 ऑक्टोबर) कर्नाटकातील पक्षाच्या 'भारत जोडो यात्रे'च्या तिसऱ्या दिवशी चामुंडी डोंगरावरील चामुंडेश्वरी मंदिरात प्रार्थना केली. राहुल मंदिरात गेले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि पक्षाचे नेतेही होते. देवी चामुंडेश्वरी ही म्हैसूर राजघराण्याची कुलदेवता आहे आणि अनेक शतकांपासून म्हैसूरची प्रमुख देवता आहे.

Web Title: Bharat Jodo Yatra: Sonia Gandhi joins rahul gandhi in Congress's 'Bharat Jodo' Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.