'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 10:40 IST2025-04-21T10:36:41+5:302025-04-21T10:40:16+5:30

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले.

Big mess in the system, even the Election Commission compromised' Rahul Gandhi raised the issue of Maharashtra elections in America | 'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा

'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा

Maharashtra Politics ( Marathi News ) :काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) अमेरिका दौऱ्यावर आहेत. गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन शहरातील ब्राउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका सत्रामध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी संबोधित केले. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी निवडणुकीत निवडणूक आयोगाने तडजोड केल्याचे ते म्हणाले.

खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) म्हणाले की, महाराष्ट्रातील वयस्करांपेक्षा जास्त लोकांनी निवडणुकीत मतदान केले. निवडणूक आयोगाने सायंकाळी ५.३० वाजता मतदानाची आकडेवारी जाहीर केली. सायंकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत ६५ लाख मतदारांनी मतदान केले. पण हे शारीरिकदृष्ट्या शक्य नाही.

झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले

'एक मत देण्यासाठी सुमारे ३ मिनिटे लागतात. जर तुम्ही थोडे गणित केले तर याचा अर्थ असा की लोक पहाटे २ वाजेपर्यंत रांगेत उभे राहिले असते. पण तसे झाले नाही, असंही राहुल गांधी म्हणाले. 

निवडणूक आयोगावर आरोप

 यावेळ राहुल गांधी म्हणाले, ज्यावेळी आम्ही व्हिडिओग्राफी चालू आहे का असे विचारले, त्यावेळी त्यांनी ते नाकारले. त्यांनी फक्त नाकारले नाही तर कायदाही बदलला. तुम्हाला आता व्हिडिओग्राफीबद्दल विचारण्याची परवानगी नाही, राहुल गांधी पुढे म्हणाले की, निवडणूक ( Election ) आयोगाने तडजोड केली आहे हे पूर्णपणे स्पष्ट आहे. व्यवस्थेत मोठी त्रुटी आहे. आम्ही हा मुद्दा अनेक वेळा माध्यमांद्वारे आणि इतर माध्यमांद्वारे सार्वजनिकरित्या उपस्थित केला आहे.

भाजपने निशाणा साधला

दरम्यान, आता राहुल गांधींच्या ( Rahul Gandhi ) या विधानावर भाजपाने निशाणा साधला आहे.  भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींच्या विधानावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'भारतीय मतदारांचा विश्वास जिंकू न शकलेले लोकशाहीविरोधी, भारतविरोधी राहुल गांधी यांनी परदेशातील भारतीय लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. राहुल नेहमीच परदेशात भारताची बदनामी का करतात? 'जॉर्ज सोरोसचा एजंट, भारतीय राज्याशी लढत आहे, राहुल गांधी आज तेच करू इच्छितात!'

खासदार राहुल गांधी २० एप्रिल रोजी अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. येथे त्यांचे स्वागत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले. पित्रोदा यांनी सोशल मिडिया एक्सवर एक पोस्ट केली. पित्रोदा यांनी लिहिले, "राहुल गांधी, अमेरिकेत आपले स्वागत आहे! तरुणांचा, लोकशाहीचा आणि चांगल्या भविष्याचा आवाज. चला ऐकूया, शिकूया आणि एकत्र येऊन विकास करूया."

राहुल गांधी येथे एनआरआयच्या सदस्यांशी, पदाधिकारी आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या सदस्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्याची माहिती दिली.

Web Title: Big mess in the system, even the Election Commission compromised' Rahul Gandhi raised the issue of Maharashtra elections in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.