नन बलात्कार प्रकरण : आरोपी बिशपला केरळ हायकोर्टाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 12:06 PM2018-10-15T12:06:01+5:302018-10-15T12:06:31+5:30
ननवरील बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला केरळ हायकोर्टाने सशर्त जामीन दिला आहे. बिशप फ्रँको मुलक्कलला केरळमध्ये न जाण्याच्या अटीवर हायकोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे.
केरळ : ननवरील बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला केरळ हायकोर्टाने सशर्त जामीन दिला आहे. बिशप फ्रँको मुलक्कलला केरळमध्ये न जाण्याच्या अटीवर हायकोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे.
2014 ते 2016 या दोन वर्षात ननवर बलात्कार केल्याचा बिशप फ्रँको मुलक्कलवर आरोप आहे. याप्रकरणी गेल्या महिन्यात बिशप फ्रँको मुलक्कलला पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीला तीन दिवसांच्या चौकशीनंतर त्याला 21 सप्टेंबरला पोलीसांनी अटक केली होती. काही दिवसांपूर्वी जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळत त्यांची 24 सप्टेंबरला दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने बिशप फ्रँको मुलक्कलला केरळमध्ये न जाण्याच्या आणि पासपोर्ट कोर्टात जमा करण्याच्या अटीवर त्याला जामीन दिला आहे.
Kerala High Court has laid down the conditions that Bishop Franco Mulakkal should not enter Kerala & should surrender his passport before the court. https://t.co/qvd7FsQgfy
— ANI (@ANI) October 15, 2018
बिशप फ्रँको मुलक्कलची व्हॅटिकनने जालंधरमध्ये नियुक्ती केली होती. केरळच्या अधिकृत दौऱ्यावर असताना ननवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. बिशप फ्रॅंको मुलक्कलला व्हॅटिकनने प्रमुखपदावरुन हटवले आहे. दरम्यान, बिशप फ्रँको मुलक्कलने व्हॅटिकनकडे आपल्याला जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांनी पोप फ्रान्सिस यांना पत्र लिहून काही काळासाठी पदमुक्त करण्याची परवानगी मागितली होती. यामागे त्यांनी खटल्याचा हवाला दिला होता. त्यांनी पत्रात लिहीले होते की, आपल्याविरोधात काही आरोपांची चौकशी सुरु आहे, पोलिसांच्या या चौकशीला सहकार्य देण्यासाठी आपल्याला पदमुक्त करण्यात यावे.