भाजपने सर्व दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 08:52 AM2023-10-10T08:52:41+5:302023-10-10T08:54:18+5:30
छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे.
संजय शर्मा -
नवी दिल्ली : नवी दिल्ली : भाजपने विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्व राज्यांमध्ये आपल्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरविले आहे. मध्य प्रदेशच्या तिसऱ्या यादीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही तिकीट देण्यात आले आहे. छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे.
राजस्थानच्या पहिल्या यादीत सात खासदारांमध्ये माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी, किरोडी लाल मीणा, बाबा बालकनाथ, देवीसिंह पटेल यांना निवडणूक मैदानात उतरविले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान बुधनी येथून निवडणूक लढणार आहेत.
सर्वस्व पणाला -
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांत भाजपचे सर्वस्व पणाला लागले गेले आहे. मध्य प्रदेशात २० वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सीपासून गड वाचवण्याची तयारी सुरू आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्याची तयारी सुरू आहे. छत्तीसगडमध्ये भाजप जोरदार लढत देण्याची तयारी करत आहे.