राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 19:45 IST2024-10-09T19:44:47+5:302024-10-09T19:45:17+5:30
ही ऑर्डर खुद्द हरियाणा भाजपने केली आहे. यात राहुल गांधी यांचा 24 अकबर रोडचा पत्ता देण्यात आला असून 550 रुपयांची एक किलो जलेबी मागवण्यात आली आहे.

राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा सलग तिसऱ्यांदा विजय झाला आहे. यानंतर संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे ती जिलेबीची. दरम्यान, हरियाणा भाजपने राहुल गांधी यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. झाले असे की, हरियाणा भाजपने एक फोटो शेअर केला आहे. यात राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी मागवण्यात आली आहे. ही ऑर्डर खुद्द हरियाणा भाजपने केली आहे. यात राहुल गांधी यांचा 24 अकबर रोडचा पत्ता देण्यात आला असून 550 रुपयांची एक किलो जलेबी मागवण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी गोहानात खाल्ली होती जिलेबी अन्... -
हरयाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोनीपतच्या गोहानामध्ये एका सभेला संबोधित केले होते. यावेळी, काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी त्यांना गोहानाची जलेबी भरवली होती. यावेळी राहुल गाधी यांनी गोहानातील जिलेबीची दबरदस्त तारीफ केली होती. एवढेच नाही तर राहुल गांधी आपली बहीण प्रियांका गांधींसाठीही येथून जिलेबी घेऊन गेले होते. हरयाणा विधानसभा निवडणुका निकाल समोर आल्यानंतर, जिलेबी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जबरदस्त ट्रेंड करत आहे.
भारतीय जनता पार्टी हरियाणा के समस्त कार्यकर्ताओं की तरफ से राहुल गांधी जी के लिए उनके घर पर जलेबी भिजवा दी है🙏🏻 pic.twitter.com/Xi8SaM7yBj
— Haryana BJP (@BJP4Haryana) October 8, 2024
जिलेबी दुकानाचा दुकानदार काय म्हणाला? -
जिलेबी तयार करणाऱ्या दुकानदाराने म्हटले आहे, "राहुल गांधी यांनी जिलेबीचे कौतुक केले होते. ही जिलेबी देशी तुपात करण्यात आली आहे. ती एक आठवड्यांपेक्षाही अदिक दिवस टिकते. जर राहुल गांधी यांनी कौतुक केले असले तर, नक्कीच आयटममध्ये दम असेल. सर्वसामान्य लोकही आमच्या जिलेबीचे कौतुक करतात."
'जिलेबी फॅक्ट्रीतील वस्तू नाही' -
ते पुढे म्हणाले, "ही जिलेबी म्हणजे एखाद्या फॅक्ट्रीतील वस्तू नाही. हा दुकानात बनवला जाणारा पदार्थ आहे. येथे दहा लोक जिलेबी तयार करतात आणि आपली सेवा करतात. आमचे तीन दुकान आहेत. हे दुकान मी जन्माला येण्यापूर्वीचे आहे. मी गेल्या 22-23 वर्षांपासून येथे काम करतो. संपूर्ण माल देशी तुपात तयार केला जातो. येथील जिलेबी भारताबरोबरच परदेशातूनही मागणी आहे.