खतम…टाटा…गुडबाय...; काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रेवर BJP'ने व्हिडिओ शेअर करून केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 01:10 PM2022-10-17T13:10:28+5:302022-10-17T13:18:24+5:30

गेल्या एक महिन्यापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे.ही यात्रा केरळवरुन कर्नाटकमध्ये आली आहे. काँग्रेसच्या यात्रेवर भाजपने एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर करुन टीका केली आहे. 

BJP has criticized Congress' Bharat Jodo Yatra by sharing an animated video | खतम…टाटा…गुडबाय...; काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रेवर BJP'ने व्हिडिओ शेअर करून केली टीका

खतम…टाटा…गुडबाय...; काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रेवर BJP'ने व्हिडिओ शेअर करून केली टीका

Next

गेल्या एक महिन्यापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे.ही यात्रा केरळवरुन कर्नाटकमध्ये आली आहे. या यात्रेला तरुणांपासून वयस्करांचा चांगला प्रतिसाद दिसत आहे. यात्रेतील राहुल गांधीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता काँग्रेसच्या यात्रेवर भाजपने एक व्हिडिओ शेअर करुन टीका केली आहे. 

रविवारी भाजपने ट्विटरवर एक अॅनिमेशन व्हिडिओ शेअर केला आहे.  यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडो यात्रेमुळे सत्ताधाऱ्यांची झालेली हतबलता दिसते असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे. 

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरुर की मल्लिकार्जुन खर्गे?, सोनिया गांधींनी केले मतदान

भाजपने ट्विटरवर दोन मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत 'शोले' चित्रपटातीत एक दृष्य धाखवत त्याने राहुल गांधी यांना अॅनिमेशनमध्ये दाखवले आहे.

या व्हिडिओमध्ये गोव्यातील काँग्रेस आमदारांनी पक्ष सोडला असल्याचे दाखवले आहे.तसेच अनेक नेते पक्ष सोडत असल्याचे दाखवले आहे. तसेच शेवटला गुलाम नबी आझाद यांच्यासोबत अनेक नेते जात असल्याचे दाखवले असून राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद दाखवला आहे. 

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा स्पष्ट उल्लेख करत भाजपने 'अॅनिमेशन व्हिडिओसह ट्विट केले आहे. "मम्मी ये दुख खतम काहे नहीं होता? खतम...टाटा....गुडबाय!'', अशी कॅप्शन या व्हिडिओला दिली आहे.

भाजपच्या या व्हिडिओला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. "काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला यश आले आहे, म्हणून भाजपचा हा नवा फॉर्म्युला आहे. निराशा आणि निराशेमुळे हे अॅनिमेशन व्हिडिओ रिलीज केले आहे, असं प्रत्युत्तर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिले. "शेअर केलेला व्हिडीओ निषेधार्ह आहे, असे म्हणावे तेवढे कमी होईल," भाजप घाबरले आहे, म्हणून ती असे करत आहेत, असंही ते म्हणाले. 

Web Title: BJP has criticized Congress' Bharat Jodo Yatra by sharing an animated video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.