Kailash Vijayvargiya : "काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या बूथ अध्यक्षाला 51 हजार रुपये बक्षीस देईन"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 10:28 AM2023-10-07T10:28:31+5:302023-10-07T10:35:44+5:30

BJP Kailash Vijayvargiya : भाजपा नेते कैलाश विजयवर्गी हे पुन्हा एकदा विधानामुळे चर्चेत आले आहे. विजयवर्गीय यांनी मतदान केंद्रावर काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या संबंधित 'बूथ अध्यक्षा'ला 51,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

BJP Kailash Vijayvargiya announces reward for party functionaries in polling booths where congress draws blank | Kailash Vijayvargiya : "काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या बूथ अध्यक्षाला 51 हजार रुपये बक्षीस देईन"

Kailash Vijayvargiya : "काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या बूथ अध्यक्षाला 51 हजार रुपये बक्षीस देईन"

googlenewsNext

मध्य प्रदेशातीलभाजपा नेते कैलाश विजयवर्गी हे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहे. विजयवर्गीय यांनी मतदान केंद्रावर काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या संबंधित 'बूथ अध्यक्षा'ला 51,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. भाजपाला आशीर्वाद द्या आणि काँग्रेसला वॉर्डमधून एक मतही मिळू नये म्हणून यावेळी मी बक्षीस जाहीर केल्याचे विजयवर्गीय म्हणाले आहेत. 

आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-1 मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विजयवर्गीय हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव असून ते इंदूर आणि इतर जागांवरून 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी पक्षाने आमदारकीचे तिकीट दिल्यापासून त्यांची विधानं अनेकदा चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी तिकीट मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत स्वत:ला 'मोठा नेता' असे संबोधले होते. नंतर कार्यकर्त्यांसमोर ते म्हणाले होते की, पक्षाने तिकीट दिले असेल तर काहीतरी 'मोठा' विचार केला असेल.

"बूथ अध्यक्षाला आम्ही 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊ"

गुरुवारी कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित केलं. येथे विजयवर्गीय म्हणाले, काँग्रेसला एकही मत मिळणार नाही अशा बूथ अध्यक्षाला आम्ही 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊ. कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, आमच्या विरोधकांनी परिसरातील जनताच आपले कुटुंब असल्याचे सांगत सुमारे दोन लाख साड्यांचे वाटप केले आहे. मला यात जायचे नाही, परंतु प्रभागातील जनता चांगली आहे आणि त्यांनी मतदारसंघात कोणतीही विकासकामे न केल्यामुळे येथे (काँग्रेस) एकही मते पडणार नाहीत याची खात्री ते घेतील असं सांगितलं. 

"मला तिकीट दिलं यावर विश्वास बसत नाही"

भाजपाकडून तिकीट मिळाल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये सांगितले होते की, "मला निवडणूक लढवण्याची 'एक टक्काही इच्छा' नाही. ते प्रचार करतील, असा माझा समज होता. आता 'मोठा नेता' झालो आहे. दररोज 8 सभा घेण्याची योजना आखण्यात आली. पाच हेलिकॉप्टरने आणि तीन कारने. पण आपल्याला जे वाटते ते सत्य नाही. मी निवडणूक लढवावी आणि पुन्हा एकदा जनतेत जावे, अशी देवाची इच्छा होती. त्यामुळेच पक्षाने तिकीट दिले." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: BJP Kailash Vijayvargiya announces reward for party functionaries in polling booths where congress draws blank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.