सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 06:57 PM2020-07-14T18:57:05+5:302020-07-14T19:02:45+5:30
उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष (Rajasthan Political Crisis) करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
'आमचं सरकार भक्कम; आमदार फुटलाच तर...'; राजस्थानमधील घडामोडीनंतर ठाकरे सरकारची प्रतिक्रिया
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर भाजपाचे नेते आणि सचिन पायलट यांचे जूने मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षात क्षमतेला स्थान नाही. अशी परिस्थिती प्रत्येक राज्यात दिसून येत आहे, असं ज्योतिरादित्या शिंदे यांनी सांगितले.
In present circumstances, there is no place for ability in the Congress party. This can be seen in every state: Jyotiraditya Scindia, BJP on political crisis in #Rajasthanpic.twitter.com/VNIHo3GIvg
— ANI (@ANI) July 14, 2020
भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती यांची ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मध्य प्रदेशमधील काँग्रेसवर आरोप केले आहे. मध्य प्रदेशात १५ महिने काँग्रेसने व्यापार आणि भ्रष्टाचाराचं सरकार चालवलं. त्यामुळे राज्यातील जनतेचा अपेक्षा भंग झाला, असा आरोप ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे.
वरिष्ठ भाजपा नेत्री उमा भारती जी से आज भोपाल प्रवास के दौरान उनके निवास पर पहुँच कर भेंट की तथा आशीर्वाद लिया। @umasribhartipic.twitter.com/VX3l0Q5Omr
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) July 14, 2020
तत्पूर्वी, सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात काँग्रेसनं कठोर कारवाई केली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यात आलं आहे. तर त्यांच्या समर्थक आमदारांची मंत्रिपदं काढून घेण्यात आली आहेत. काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबद्दलची माहिती दिली. 'पूर्ण बहुमतानं निवडून आलेलं सरकार पाडण्यामागे भाजपाचं षडयंत्र आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करून, ईडी आणि आयकर विभागाकडून दबाव आणून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपानं सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले आणि त्यांनी जनतेनं निवडून दिलेल्या सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला,' अशा शब्दांत सुरजेवाला यांनी सचिन पायलट आणि भाजपा यांचा समाचार घेतला.
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून दूर करतानाच त्यांच्या समर्थक आमदारांवरही पक्षानं कारवाई केली आहे. विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. 'आम्ही गेल्या ७२ तासांपासून सचिन पायलट यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. राहुल गांधी यांच्या माध्यमातून सोनिया गांधींनी पायलट यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला. के. सी. वेणुगोपाल त्यांच्याशी अनेकदा बोलले. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न झाले. पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असल्याचं सांगण्यात आलं. काही मतभेद असल्यास संवादाच्या माध्यमातून सोडवता येईल, असं आवाहन करण्यात आलं. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही,' असं सुरजेवाला यांनी सांगितलं.